पंतप्रधान कार्यालय
सतर्कता आणि भ्रष्टाचार निर्मूलनावरील राष्ट्रीय परिषदेचे पंतप्रधान करणार उद्घाटन
Posted On:
25 OCT 2020 3:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी येत्या 27 ऑक्टोबर 2020 रोजी संध्याकाळी 4:45 वाजता सतर्कता (दक्षता)आणि भ्रष्टाचार निर्मूलन या संकल्पनेवर आधारित "सतर्क भारत, समृध्द भारत" (Vigilant India, Prosperous India) या परीषदेचे आभासी पध्दतीने उद्घाटन करणार आहेत.
या परिषदेचा उद्घाटनपर समारंभ प्रत्यक्षात (live) दाखविला जाणार असून https://pmindiawebcast.nic.in/ या लिंकवर तो पाहता येईल.
पार्श्वभूमी:
केंद्रीय अन्वेषण विभाग दरवर्षी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत सतर्कता जागरुकता सप्ताह साजरा करत असतो आणि या निमित्ताने ही परिषद याच सप्ताहात आयोजित केली जात आहे. या परिषदेत सतर्कता या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यायोगे लोकांमध्ये जनजागृती करणे आणि नागरिकांना सहभागी करत भारताच्या सार्वजनिक जीवनातील अस्मिता आणि सत्यनिष्ठा या संकल्पनांचे सबलीकरण करणे हा या परीषदेचा हेतू आहे.
या तीन दिवस चालणाऱ्या परिषदेत, परदेशी कायद्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या कक्षांमुळे तपास करण्यात येणारी आव्हाने, भ्रष्टाचार विरोधात कार्यरत नियंत्रणासाठी सतर्कता प्रक्रिया, आर्थिक घोटाळे समाविष्ट असणाऱ्या कार्यप्रणालीतील सुधारणा आणि बँकांतील फसवणूकींना प्रतिबंध, लेखा परीक्षण प्रभावीपणे करुन त्याने विकास घडवून आणणे, भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यात नव्या सुधारणा करत भ्रष्टाचार विरोधात लढणे, क्षमता विस्तार आणि प्रशिक्षण, त्वरित आणि प्रभावीपणे तपास करण्याकरता बहुआयामी समन्वय, आर्थिक अपराध करणाची प्रवृत्ती, सायबर गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या उत्तम कार्यपध्दतींचे एकमेकांत आदानप्रदान या सारख्या विषयांवर चर्चा होणार आहे.
या परिषदेमुळे अशाप्रकारचे कार्य करणाऱ्या धोरणनीतीतज्ञ आणि अशा व्यवसायात असणाऱ्यांना एक समान मंच उपलब्ध होईल आणि त्यायोगे प्रक्रीयागत सुधारणा आणि प्रतिबंधात्मक दक्षता उपाययोजना करून उत्तम कारभार आणि जबाबदार प्रशासनाला प्रारंभ होईल. हा भारतात व्यवसाय सुलभीकरणासाठी महत्वाचा घटक राहील.
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), ईशान्य राज्ये विकास (DoNER), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती वेतन, अणूऊर्जा आणि अंतरीक्ष, डॉ. जितेंद्र सिंह हे देखील या परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करणार आहेत. या परीषदेला भ्रष्टाचार निर्मूलन विभागाचे प्रमुख, सतर्कता आयोग अधिकारी, राज्य / केंद्रशासित प्रदेशातील आर्थिक गुन्हेगारी / केंद्रीय अन्वेषण विभाग प्रमुख, गुन्हे अन्वेषण विभाग अधिकारी, केंद्रीय सतर्कता (दक्षता) आयोगातील अधिकारी, सीबीआय अधिकाऱ्यांसह विविध केंद्रीय एजन्सीजचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. परीषदेच्या उदघाटन सत्रांत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्य सचिव तसेच पोलीस महानिरीक्षक हजर असतील.
* * *
M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667483)
Visitor Counter : 193
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam