गृह मंत्रालय

इंडो – तिबेटियन सीमा पोलिस (आयटीबीपी) च्या 59 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी घेतला भाग


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयटीबीपीच्या पूर्ण सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध

आयटीबीपी अधिक कार्यक्षम आणि आधुनिक होण्यासाठी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह, यांच्या प्रभावशाली नेतृत्त्वाखाली गृहमंत्रालयाने उचलली महत्त्वाची पावले

Posted On: 24 OCT 2020 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2020

इंडो – तिबेटियन सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) 59 व्या स्थापना दिनानिमित्त ग्रेटर नोएडा येथे आयोजित  करण्यात आलेल्या स्थापना दिन कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज भाग घेतला आणि संचलनाची मानवंदना स्वीकारली. आपली संस्कृती वसुधैव कुटुंबकम संकल्पनेचे महत्त्व विषद करणारी आहे, जी जागतिक शांततेचा संदेश देते. त्याच वेळेस शत्रूकडून निर्माण केल्या जाणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीत पूर्णपणे सक्षम राहण्याचा मंत्र देखील आपल्याला देते, असे जी. किशन रेड्डी आपल्या भाषणात म्हणाले.

आयटीबीपीद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सेवांची दखल घेत, रेड्डी म्हणाले, की आपल्या पर्वतीय सीमांवरील अत्यंत प्रतिकूल आणि कठोर परिस्थितीत देखील उत्कटतेने आणि व्यावसायिकतेच्या उच्च आदेशांसह सैन्य दल कार्यरत आहे. ते म्हणाले, जम्मू – काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढा देत असो किंवा छत्तीसगडमधील नक्षलवादी, आयटीबीपीने कायमच उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

गृह मंत्रालयाने आयटीबीपीला 47 सीमा चौक्यांची उभारणी करण्यासाठी मान्यता दिली आहे. या वर्षी 28 प्रकारची नवी वाहने देण्यात आली आहेत. आयटीबीपीसाठी 7,223 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद तर रुपये 15 कोटी व्यवस्थापनासाठी मंजूर झाले आहेत, अशी माहिती रेड्डी यांनी यावेळी दिली.

आयटीबीपी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना रेड्डी यांनी, राष्ट्र आणि राज्यकर्ते नेहमीच शहीदांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभे आहे, असे आश्वासन यावेळी दिले.

रेड्डी यांनी आयटीबीपीच्या जवानांना सहा राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवंत सेवांसाठी 23 पोलिस पदके प्रदान दिली. आपल्या भाषणाचा समारोप करताना ते म्हणाले, की आयटीबीपीच्या जवानांच्या बलिदान आणि पराक्रमासाठी देश नेहमीच अभिमानी आणि ऋणी राहील.

 

S.Tupe/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1667342) Visitor Counter : 210