नौवहन मंत्रालय

मनसुख मांडवीय यांनी केला,  "व्हीटीएस आणि व्हीटीएमएससाठी स्वदेशी सॉफ्टवेअर सोल्यूशन उपाय विकास" चा प्रारंभ

व्हीटीएस / व्हीटीएमएस हे  जहाजांची स्थिती, अन्य रहदारीची स्थिती किंवा हवामानशास्त्रीय धोक्याचे इशारे जाणून घेण्याबाबतचे एक सॉफ्टवेअर आहे जे बंदरातील किंवा  जलमार्गावरील वाहतुकीचे व्यापक व्यवस्थापन करते .

‘मेक इन इंडिया’ व्हीटीएस आणि व्हीटीएमएस सॉफ्टवेअर ‘मेक फॉर द वर्ल्ड’ जहाज वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा मार्ग प्रशस्त करेल: मनसुख मांडवीय

स्वदेशी सॉफ्टवेअर उपाय विकसित करण्यासाठी आयआयटी चेन्नईला 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Posted On: 20 OCT 2020 4:37PM by PIB Mumbai

 

नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) मनुसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्लीत जहाज वाहतूक सेवा  (व्हीटीएस) आणि जहाज वाहतूक देखरेख प्रणाली (व्हीटीएमएस) साठी स्वदेशी सॉफ्टवेअर सोल्यूशन विकासाचा ई-शुभारंभ केला.

उद्घाटनपर भाषणात मांडवीय यांनी भारतीय बंदरांच्या वाहतूक व्यवस्थापनांसाठी महागड्या परदेशी बनावटीच्या सॉफ्टवेअर सोल्यूशनवर अवलंबून न राहता देशाच्या गरजेनुसार स्वदेशी प्रणाली विकसित करण्यावर भर दिला.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001G72T.jpg

व्हीटीएस आणि व्हीटीएमएस हे एक सॉफ्टवेअर आहे जे जहाजांचे स्थान, इतर रहदारीची स्थिती किंवा हवामानविषयक धोक्याचे इशारे तसेच बंदरात किंवा जलमार्गावरील वाहतुकीचे विस्तृत व्यवस्थापन  ठरवते . जहाज वाहतूक सेवा  (व्हीटीएस) समुद्रात जीवनाची सुरक्षा, नौकानयनाची सुरक्षा आणि कार्यक्षमता , सागरी पर्यावरणाचे आणि लगतच्या किनारपट्टीचे आणि दुकानांचे सागरी वाहतुकीच्या संभाव्य दुष्परिणामांमधून संरक्षण करण्यात योगदान देते. जहाज वाहतुक व्यवस्थापन  प्रणाली  जगातील काही व्यस्त सागरी क्षेत्रात उभारण्यात आली आहे  आणि सुरक्षित नौकानयन , अधिक कार्यक्षम वाहतुकीचा ओघ  आणि पर्यावरणाच्या संरक्षणात मोलाचे योगदान देत आहे.

बंदरे आणि ती वापरणाऱ्यांच्या हिताचा  विचार करून व्यस्त संपर्क मार्ग , प्रवेश मार्ग आणि बंदरांमधील वाहतुकीमध्ये  सुरक्षितपणे समन्वय साधता येऊ शकतो. दुर्घटना आणि आपत्कालीन परिस्थितीचा गतीने सामना करता येतो.  वाहतूक  हालचालींद्वारे प्राप्त माहिती बंदर प्रशासन, बंदर अधिकारी, तटरक्षक दल, शोध आणि बचाव सेवांसाठी संदर्भ माहिती म्हणून संग्रहित करता येऊ शकते आणि वापरता येऊ शकते.

सध्या भारतीय किनारपट्टींवर अंदाजे 15 व्हीटीएस प्रणाली कार्यरत आहेत आणि व्हीटीएस सॉफ्टवेअरमध्ये एकसमानता नाही  कारण प्रत्येक प्रणालीचे  स्वतःचे व्हीटीएस सॉफ्टवेअर आहे. स्वदेशी सॉफ्टवेअर विकसित केले जात असून आत्मनिर्भर  भारत उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी व्हीटीएमएस सॉफ्टवेअर विकासाच्या संयुक्त विकासावर प्रकाश आणि दीपस्तंभ  महासंचालक (डीजीएलएल) कार्यालयाच्या अलिकडच्या सकारात्मक सहकार्यामुळे या क्षेत्रातील सहकार्याला  बळ मिळेल. त्याचबरोबर याचा फायदा भारत आणि प्रदेशातील बंदर क्षेत्राला होईल.  दहा-महिन्यांच्या कालावधीत चाचणी करण्यासाठी आणि दैनंदिन कामकाजासाठी सज्ज होईपर्यंत समांतर प्रणाली म्हणून परिचालन करण्यासाठी एक प्रोटोटाइप प्रणाली विकसित केली जाईल.

स्वदेशी व्हीटीएस सॉफ्टवेअरच्या विकासामुळे या बाबींवरील परकीय चलन खर्च कमी होईल आणि व्हीटीएस सॉफ्टवेअरच्या परदेशी मदतीवरील  अवलंबत्वही कमी होईल. आणि त्याचा  व्हीटीएस सॉफ्टवेअरच्या स्वदेशी विकासात फायदा होईलः

भारतातील विविध व्हीटीएससाठी परकीय चलनात बचत

भारतीय व्यापार अनुकूल राष्ट्रांना - मालदीव, मॉरिशस, म्यानमार, श्रीलंका, मॉरिशस, बांगलादेश आणि आखाती देश यांना व्हीटीएस सॉफ्टवेअर पुरवले जाऊ शकते.

भविष्यातील सॉफ्टवेअरच्या अद्ययावतीकरणासाठी खर्च कमी करेल.

बंदरांच्या एमआयएस / ईआरपी सॉफ्टवेअरशी आंतरजोडणी  करणे सोपे होईल.

भारतीय व्हीटीएस सॉफ्टवेअरची उपलब्धता भारतीय कंपन्यांना जागतिक बोलीमध्ये व्यावसायिकदृष्ट्या स्पर्धात्मक बनवेल.

भारतीय नौदल आणि एनसीव्हीटीएसच्या राष्ट्रीय सागरी क्षेत्र जनजागृती कार्यक्रमाची अंमलबजावणी डीजीएलएलने केली आहे. किनारपट्टीवरील जहाज वाहतुकीसाठी नौकानयन प्रणाली ला कमी खर्चात भारतीय व्हीटीएस सॉफ्टवेअरद्वारे व्यवहार्य बनणे शक्य होईल.

नौवहन मंत्रालयाने स्वदेशी व्हीटीएस सॉफ्टवेअरच्या विकासासाठी आयटीआयटी, चेन्नईला 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

या कार्यक्रमाला नौवहन  मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, प्रमुख बंदरांचे  अध्यक्ष आणि आयआयटी चेन्नईचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1666124) Visitor Counter : 117