आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताने महत्वाचे मैलाचे दगड केले पार


सुमारे तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या 50000 पेक्षा कमी

एकूण संख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी

सक्रीय रुग्णांच्या संख्येत आणखी घट, आता रुग्णसंख्या 7.5 लाखांपेक्षा कमी

Posted On: 20 OCT 2020 2:48PM by PIB Mumbai

 

भारताने कोविडविरुद्धच्या लढाईत अनेक महत्वाचे मैलाचे दगड पार केले आहेत.

गेल्या 24 तासांत आढळलेल्या कोविड-19 च्या रुग्णांची संख्या सुमारे तीन महिन्यांनंतर 50000 (46,790) पेक्षा कमी आढळली आहे. याआधी, 28 जुलै रोजी रुग्णांची एका दिवसातली संख्या  47,703 असल्याची नोंद आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001CXC1.jpg

दररोज कोविडचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून मृत्यूदरही सातत्याने घटतो आहे. तसेच सक्रीय रुग्णांचे प्रमाण देखील सातत्याने कमी होत आहे.

भारताने मिळवलेले आणखी एक यश म्हणजे, एकूण संख्येच्या तुलनेत, सक्रीय रुग्णांचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. सध्या देशभरात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7.5 लाखांपेक्षाही कमी (7,48,538) आहे. आजपर्यंतच्या कोविड रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे हे प्रमाण  9.85% इतके आहे. 

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002VZB3.jpg

केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक धोरणानुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी, एकत्रित आणि निश्चित ध्येय ठेवून केलेल्या प्रभावी अंमलबजावणीचा हा परिणाम आहे.त्याशिवाय देशभरात चाचण्या, त्वरित आणि प्रभावी निरीक्षण आणि ट्रॅकिंग, रूग्णांना  त्वरित रुग्णालयात दाखल करणे तसेच प्रमाणित उपचारांच्या प्रोटोकॉलचे कसोशीने पालन करण्यामुळे कोविडविरुध्दच्या लढ्यात हे यश मिळाले आहे. तसेच, या लढ्यात देशभर निस्वार्थ सेवा देणारे कोविड योद्धे, डॉक्टर्स, आघाडीवर काम करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या निस्वार्थ सेवेचाही हा परिणाम आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0034X5Y.jpg

सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होत असतांना दुसरीकडे मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 67 लाखांपेक्षा अधिक रुग्ण (67,33,328) या आजारातून बरे झाले आहेत. सक्रीय रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतील तफावत सातत्याने वाढत असून, आज ही तफावत  59,84,790 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत 69,720 रुग्ण बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आता देशाचा रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर  88.63% इतका आहे.

बरे झालेल्या रूग्णांपैकी 78% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील असल्याचे आढळले आहे.

महाराष्ट्रात एका दिवसात, सर्वाधिक 15,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत, तर त्या खालोखाल कर्नाटकात एका दिवसात 8,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004CKWJ.jpg

नव्याने आढळलेल्या रूग्णांमधील 75% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांत 5,000 पेक्षा अधिक सक्रीय रुग्ण आढळले आहेत.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005V6NS.jpg

गेल्या 24 तासांत देशभरात 587 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 81% टक्के 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी मृतांचा आकडा 600 पेक्षा कमी आढळला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक म्हणजे 125 मृत्यूंची नोंद झाली.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006JEJE.jpg

कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असलेला भारत एकमेव देश आहे, तसेच मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. आज हा मृत्यूदर 1.52% इतका आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने होत असलेल्या घटीचा हा परिणाम आहे.

***

U.Ujgare/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1666084) Visitor Counter : 203