नौवहन मंत्रालय

भारत आणि इराणमधले चाबहार बंदर या दरम्यानच्या माल वाहतुकीसंदर्भातल्या 40% सवलतीला एक वर्षाची मुदत वाढ

Posted On: 16 OCT 2020 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2020

  
जवाहरलाल नेहरू बंदर, दीनदयाळ बंदर आणि इराण मधल्या चाबहार,शाहीद बेहेश्ती बंदर या दरम्यानच्या माल आणि जहाजांच्या किनारी वाहतुकी संदर्भातल्या शुल्कासाठी सध्याच्या 40 % या सवलतीच्या दराला नौवहन मंत्रालयाने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. 

जहाजासंबंधी सवलतीचे शुल्क  प्रमाणानुसार लावले जाईल, त्यासाठी शाहीद बेहेस्ती बंदरात किमान 50 टीईयु किंवा 5000 एमटी माल जहाजावर चढवला असला पाहिजे. 

बंदरे,इंडियन पोर्ट ग्लोबल लिमिटेडच्या समन्वयाने मानक संचालन पद्धतीचा अवलंब करत चाबहार बंदरात शाहीद बेहेश्ती टर्मिनल वर भरलेल्या मालालाच  सवलतीचा दर लावला जाईल हे सुनिश्चित करतील. 

या सवलतीला मुदतवाढ देण्यामागे,इराणमधल्या चाबहार बंदरामार्गे होणाऱ्या व्यापाराला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. यामुळे जवाहरलाल नेहरू बंदर, दीनदयाळ बंदर आणि इराण मधल्या चाबहार,शाहीद बेहेश्ती बंदर या दरम्यानच्या  किनारी मालवाहतुकीला चालना मिळणार आहे. 


* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1665154) Visitor Counter : 141