संरक्षण मंत्रालय

भारत - कझाकस्तान संरक्षण सहकार्य: वेबिनार आणि प्रदर्शनाचे आयोजन

Posted On: 16 OCT 2020 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2020


भारत आणि कझाकस्तान दरम्यान 15/10/2020 रोजी एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. "मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड, भारत - कझाकस्तान संरक्षण सहकार्य: वेबिनार आणि प्रदर्शन" ही या वेबिनारची संकल्पना होती.  संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाअंतर्गत फिक्कीद्वारे याचे आयोजन करण्यात आले  होते.

पुढील पाच वर्षांत संरक्षण सामुग्रीच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आणि 5 अब्ज डॉलर्सचे संरक्षण निर्यात उद्दिष्ट गाठण्यासाठी मित्र देशांसोबत आयोजित करण्यात येत असलेल्या वेबिनार मालिकेचा हे वेबिनार एक भाग आहे.

दोन्ही देशांचे राजदूत आणि दोन्ही बाजूंच्या मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी  वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.  सह-विकासासाठी आणि सह-उत्पादनासाठीच नव्हे तर एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देखील संधीचा लाभ उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

एल अँड टी डिफेन्स, अशोक लेलँड लिमिटेड, भारत फोर्ज, झेन टेक्नॉलॉजीज, एल्कॉम इनोव्हेशन्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीज आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अशा विविध भारतीय कंपन्यांनी वेबिनारमध्ये आर्टिलरी सिस्टम, रडार, संरक्षित वाहने, क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षण उपकरणे, ट्रेनिंग सोल्यूशन्स सारख्या उपकरणांवर सादरीकरण केले. बीईएलने कझाकस्तानमध्ये प्रतिनिधी कार्यालय उघडण्याची आपली योजना जाहीर केली.

वेबिनारमध्ये 350 हून अधिक जण सहभागी झाले होते आणि 39 व्हर्च्युअल प्रदर्शन स्टॉल्स होते, यात कझाक कंपन्यांचे 7 स्टॉल्स समाविष्ट होते.


* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1665107) Visitor Counter : 243