सांस्कृतिक मंत्रालय

सांस्कृतिक कार्यक्रम, आभासी उपक्रम, कला संस्कृती विकास योजनेअंतर्गत ऑनलाइन कार्यक्रम यांच्या आयोजनासाठी सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने मार्गदर्शक तत्वे जारी


मार्गदर्शक तत्वांचे पालन करून आभासी कार्यक्रमांच्या माध्यमातून कलाकारांना सद्यस्थितीमध्ये आर्थिक मदत मिळणे शक्य

Posted On: 16 OCT 2020 2:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2020

 

सध्या संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा उद्रेक झाला आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांना जाणवत आहे. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना या साथीमुळे  विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. साथीमुळे कलाकृतींचे प्रदर्शन, कार्यक्रमांचे सादरीकरण प्रत्यक्ष करणे अजिबात शक्य नाही. असे कार्यक्रम पुढे ढकलले जात आहेत किंवा रद्द करण्यात येत आहेत. यामुळे अनेक कलाकारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने कलाकारांना डिजिटील मंचाव्दारे आपली कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. यामध्ये संस्कृती मंत्रालयाच्यावतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्यांच्याकडे डिजिटल माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत, त्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या (परफाॅर्मिंग आर्टस् ब्युरो) संस्कृती विकास योजनेमधून (केएसव्हीवाय) प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्यासाठी विविध कार्यक्रमांची योजना राबविण्यात येत आहे. यासाठी अनुदानही मंजूर करण्यात येते.

सध्याची कोविडस्थिती लक्षात घेवून मर्यादित प्रेक्षकांसाठी कार्यक्रम सादरीकरणास नुकतीच परवानगी दिली आहे. संस्कृती मंत्रालयाने ‘कला संस्कृती विकास’च्या विविध योजनांअंतर्गत अनुदान मंजूर केलेल्या कलाकारांना तसेच संस्थांना मदत करण्यासाठी पुढील मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. आभासी कार्यक्रम करण्यासाठी केएसव्ही योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

कार्यक्रम सादरीकरणासाठी मार्गदर्शक तत्वे:-

  1. ज्या कलाकारांना/संस्थांना केएसव्ही योजनेअंतर्गत अनुदान मंजूर झाले आहे, त्यांनी आपली कला -शिल्प या विषयावर आभासी कार्यशाळा, प्रात्यक्षिकांसह व्याख्याने, वेबिनार, ऑनलाइन कार्यक्रम/ उत्सव इत्यादी  सामाजिक माध्यमांतून आभासी पद्धतीने सादर करावे. फेसबुक, यूट्यूब यांचा वापर करावा (योजनेनुसार प्रत्येकाचा तपशील परिशिष्टामध्ये देण्यात आला आहे.)
  2. आपण सादर करणार असलेल्या कला प्रकाराच्या माहितीचे संबंधित कागदपत्रे सादर करण्यात यावीत. सादरीकरणाची मान्यता घेवून अनुदान पूर्ततेसाठी काही काळापर्यंत सॉफ्ट प्रती ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
  3. आभासी कार्यक्रम सादर करू इच्छिणा-या संबंधित संस्थांच्या प्रस्तावाचे वर्तमानमत्रातील निवेदन प्रस्तूत करण्याची आवश्यकता नसली तरीही त्या आभासी कार्यक्रमाची लिंक/ रेकॉर्डिंग आणि इतर माहिती सादर करावी लागेल. डिजिटल माध्यमातून हा कार्यक्रम किती प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, किती प्रसार झाला, याची माहिती सादर करावी लागेल.
  4. या आभासी कार्यक्रमासाठी झालेला एकूण खर्च यांची माहिती ‘यूटिलायझेशन सर्टिफिकेट’मध्ये योग्य पद्धतीने प्रतिबिंबीत झालेली असावी.

 

* * *

U.Ujgare/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1665084) Visitor Counter : 887