आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

NMDC मर्यादित मधून नागनार पोलाद प्रकल्पाच्या तात्विक निर्गुंतवणुकीस मंत्रीगटाची मंजूरी

Posted On: 14 OCT 2020 6:49PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींसंबधीत मंत्रीगटाने राष्ट्रीय खनिजे विकास महामंडळ (NMDC) मर्यादित मधून नागनार पोलाद प्रकल्पाच्या (NSP) विभाजनास तात्विक मंजूरी दिली. या धोरणात्मक निर्गुंतवणूकीसाठी विभाजित कंपनी (NSP) मधील भारत सरकारच्या संपूर्ण भागभांडवलाची विक्री एखाद्या योग्य खरेदीदारास करण्यासाठीही मंजूरी देण्यात आली. 

NSP हा वार्षिक 3 दशलक्ष टन (mta) क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प NMDC ने छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात नागनार येथे 1980 एकरवर उभारलेला आहे. त्याची सुधारित अंदाजे किंमत ( 14.07.2020 रोजी).  23,140 crore रु. आहे. आतापर्यंत NMDC ने या प्रकल्पात 17,186 कोटी रुपये गुंतवले असून त्यापैकी 16,162 कोटी रुपये NMDC च्या निधीतले आहेत तर 524 कोटी रुपयांचे भागभांडवल रोखेबाजारातून उभे करण्यात आले.

या मंजूरीसह आर्थिक बाबींसबधित मंत्रीमंडळ गटाने NMDCचा भाग म्हणून नागनार प्रकल्पाच्या निर्गुंतवणुकीच्या याआधीच्या  27 ऑक्टोबर 2016 च्या निर्णयात  सुधारणा केली आहे.

 

निर्गुंतवणूकीआधीच  NSP ला स्वतंत्र कंपनी म्हणून मिळालेल्या मंजूरीमुळे खालील लाभ होतील,

या विभाजनामुळे , NMDC ही आपल्या मुख्य काम म्हणजेच खनिकर्माकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकेल

या विभाजनानंतर NSP ही स्वतंत्र कंपनी म्हणून गणली जाईल आणि NMDC and NSP चे स्वतंत्र व्यवस्थापन संबधित कंपनीचे कार्य आणि आर्थिक परिस्थितीला जबाबदार असेल. NMDCचे भागभांडवलदार हे त्यांच्या भागभांडवलाच्या प्रमाणानुसार विभाजित  कंपनीचेही (NSP) भागभांडवलदार असतील.

विभाजनानंतर गुंतवणूकदारांना NMDC आणि NSP च्या स्वतंत्र कामकाजाची आणि मिळकतीची योग्य  कल्पना येईल.

या विभाजनातून मिळणारा भांडवली नफा हा कर तटस्थ ठेवणारा  असेल.

ही विभाजनाची प्रक्रिया तसेच निर्गुंतवणूक या समांतर सुरू राहतील आणि विभाजित कंपनीची (NSP)  निर्गुंतवणूक सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण होईल याची नोंद आर्थिक बाबींसंबधीत मंत्रीगटाने  घेतली आहे.

NMDC ही भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या अखत्यारीतील भांडवलबाजारातील सूचीबद्ध कंपनी असून त्यातील 69.65% भागभांडवल भारत सरकारचे आहे.

*****

B.Gokhale/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1664449) Visitor Counter : 182