युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

SAI व NRAI यांच्यावर राष्ट्रीय नेमबाजी शिबीर सुरक्षित जैविक वातावरणात पार पाडण्याची संयुक्त जबाबदारी

Posted On: 13 OCT 2020 3:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2020

फक्त ऑलिंपिक नेमबाजांसाठीचे राष्ट्रीय नेमबाजी शिबीर गेल्या आठवड्यात घोषित केल्यानुसार दोन महिन्यांच्या कालावधीसाठी (ऑक्टोबर 15 ते डिसेंबर 17) डॉ. करणी सिंग शुटींग रेंज इथे होणार आहे. कोरोनो व्हायरस प्रकोप लक्षात घेता सुरक्षित बायो-बबल (बाहेरील जगापासून जैविक सुरक्षित अंतर) राखून नेमबाजांना सुरक्षित प्रकारे प्रशिक्षण देण्यासाठी  मानक कार्यपद्धतीचे (SOP) पालन करण्याची जबाबदारी भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि भारतीय रायफल असोसिएशनने संयुक्तरित्या घेतली आहे. 

शूटींग रेंजच्या व्यवस्था राखण्याची जबाबदारी डॉ करणी सिंग शूटींग रेंजच्या व्यवस्थापकानी स्वीकारली आहे. सुरक्षितता पालनाच्या दृष्टीने शिबीरार्थी व रेंज कर्मचारी यांच्यामध्ये कमीत कमी संपर्क यावा या दृष्टीने संपूर्ण परिसराची जोखिम श्रेणीनुसार हरित, केशरी, पीत आणि तांबडा ( ग्रीन, ऑरेंज, यलो आणि रेड ) अशी वर्गवारी करण्यात आली आहे.

शिबीरार्थींच्या भोजन तसेच निवासाची व्यवस्था भारतीय रायफल असोसिएशनने (NRAI) ने या ठिकाणाजवळील हॉटेलवर केली असून निकषानुसार भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) सपोर्ट देईल. हॉटेलपासून शूटींग रेंजपर्यंत सुरक्षित बायो-बबल राखण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी  NRAI ची असेल. NRAI ने ठरवलेल्या निकषांनुसार दिल्ली एनसीआर बाहेरून आलेल्या खेळाडूना/प्रशिक्षकांना हॉटेलवर 7 दिवसांचे विलगीकरण पाळावे लागेल. दिल्ली एनसीआरमधील खेळाडूंना  त्याच्या स्वतःच्या निवासस्थानी  7 दिवसांचे स्व-विलगीकरणाचे पालन केल्यानंतरच संपूर्ण शिबीर कालावधीसाठी अन्य नेमबाजांमध्ये सामील होता येईन.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने निश्चित केलेली मानक कार्यपद्धती (SOP) ही विचारपूर्वक बनवलेली आहे. मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय लॉकडाउननंतर होत असलेले हे पहिलेच शिबीर आहे. शिबीरार्थींना सुरक्षित आणि आरामदायक वातावरणात खेळ करता यावा म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे असे  NRAI चे सचिव राजीव भाटिया यांनी सांगितले.

सर्व नेमबाज आणि प्रशिक्षकांना कोविड टेस्ट करून घ्यावी लागेल आणि NRAI ने हॉटेलवर याची व्यवस्था केली आहे.

 

M.Iyengar/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1663994) Visitor Counter : 135