सांस्कृतिक मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या श्रीमती विजया राजे शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाच्या नाण्याचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे करणार प्रकाशन

प्रविष्टि तिथि: 11 OCT 2020 4:57PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी  उद्या दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी श्रीमती विजया राजे शिंदे यांच्या स्मरणार्थ100 रुपयाच्या नाण्याचे प्रकाशन करणार आहेत. श्रीमती विजया राजे शिंदे या ग्वाल्हेरच्या राजमाता म्हणून लोकप्रिय होत्या. त्यांच्या जन्मशताब्दी समारंभा निमित्ताने हे नाणे प्रकाशित करण्यात येणार आहे. या समारंभाच्या निमित्ताने अर्थ मंत्रालयाने हे विशेष  नाणे टांकसाळीत  तयार केले असुन उद्या पंतप्रधान त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त हे नाणे प्रकाशित करणार आहेत. या समारंभात श्रीमती शिंदे यांचे कुटुंबीय आणि इतर माननीय व्यक्ती  देशाच्या विविध भागांतून या दृकश्राव्य माध्यमातून होणाऱ्या समारंभात सहभागी होतील.

*****

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1663531) आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam