माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘कोविड-19 योग्य वर्तन’ जनआंदोलनाला उद्या प्रारंभ करणार

Posted On: 07 OCT 2020 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑक्‍टोबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘कोविड-19 योग्य वर्तन’ जनआंदोलनाला उद्या, दि. 8 ऑक्टोबर, 2020 ‘व्टिट’च्या  माध्यमातून प्रारंभ करणार आहेत. 

आगामी काही दिवसांतच सण-उत्सव येणार आहेत तसेच हिवाळा सुरू होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. अशावेळी कोविड-19 महामारीचा विचार करून नागरिकांनी सुयोग्य वर्तन ठेवणे आवश्यक आहे, या दृष्टीने पंतप्रधान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. 

या जन आंदोलनामध्ये लोकांनी सहभागी व्हावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. लोकांनी ‘मास्क वापरावा, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, हात स्वच्छ ठेवावेत’ असा मुख्य संदेश मोहिमेतून दिला जाणार आहे. यासाठी खर्च अतिशय कमी असला तरी त्या मोहिमेमधून परिणाम मात्र खूप उच्च,चांगला मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.  

या आंदोलनामध्ये सर्वजण ‘कोविड-19 शपथ’ घेणार आहेत. केंद्र सरकारची मंत्रालये/ सर्व कार्यालयीन विभाग आणि राज्य सरकारे / केंद्रशासित प्रदेश यांच्याव्दारे एक नियोजित कृती आराखडा अंमलात आणण्यात येणार आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असणार आहे. 

  1. ज्या जिल्ह्यांमध्ये रूग्णांची जास्त संख्या आहे, अशा लक्ष्यित क्षेत्रामध्ये संदेशाचा प्रसार 
  2. प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचू शकेल, असा सोपा आणि सहज समजण्या योग्य संदेश 
  3. सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांचा वापर करून संपूर्ण देशभरामध्ये संदेशाचा प्रसार
  4. सार्वजनिक स्थानांवर बॅनर आणि पोस्टर्स लावणार; आघाडीवर कार्यरत असलेले कर्मचारी आणि सरकारी योजनांचे लाभार्थी लक्ष्यित करणे 
  5. सरकारी इमारतींच्या आवारामध्ये होर्डिंग्ज, पेंटिंग्ज, इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन फलक 
  6. स्थानिक पातळीवर आणि राष्ट्रीय स्तरावर प्रभाव असलेल्या व्यक्तींकडून संदेश 
  7. नियमित जागरूकता निर्माण करण्यासाठी फिरत्या व्हॅनचा वापर 
  8. श्राव्य संदेश, पत्रके, माहिती पत्रके यांच्याव्दारे जागरूकता 
  9. कोविडविषयी संदेशाचे प्रसारण करण्यासाठी स्थानिक केबल ऑपरेटरांची मदत घेणार 
  10. संदेश प्रभावीपणे आणि सर्वदूर परिणामकारकतेने पोहोचण्यासाठी प्रसार माध्यमांमध्ये समन्वय साधून मोहीम राबविणार 

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1662506) Visitor Counter : 308