मंत्रिमंडळ
भारत आणि जपान या देशांदरम्यान सायबर सुरक्षा क्षेत्रातील नवा सहकार्य करार
Posted On:
07 OCT 2020 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2020
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि जपान या देशांदरम्यान सायबर सुरक्षा क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या नव्या करारावर स्वाक्षऱ्या करायला मंजुरी दिली आहे.
परस्पर फायद्यांच्या अनेक विषयांसोबत, सायबर विश्वात क्षमता बांधणी, महत्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण, उदयोन्मुख तंत्रज्ञानाबाबत सहकार्य, सायबर सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बाबी आणि घटना तसेच सायबर विश्वात आकसाने केलेले एखादे चुकीचे काम, तसेच त्यावरचे उपाय यांच्या बद्दलच्या माहितीचे आदानप्रदान या सर्व मुद्द्यांबाबत दोन्ही देशांमधील नव्या करारामुळे सहकार्य वाढेल. त्याचबरोबर आयसीटी अर्थात माहिती संचार तंत्रज्ञानाच्या सुरक्षेला असलेल्या सायबर धोक्यांपासून संरक्षणासाठी प्रत्यक्ष सहकार्याची संयुक्त प्रणाली देखील तयार करता येईल.
या सहकार्य कराराद्वारे, संयुक्त राष्ट्रांसह सर्व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सहकार्य, आयसीटी संबंधित सर्व उत्पादनांच्या पुरवठा साखळीच्या अखंडतेला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व धोरण आणि प्रक्रियांवर चर्चा करून माहितीची देवघेव करणे, सरकार ते सरकार आणि व्यापार ते व्यापार अशा प्रत्यक्ष सहकार्यातून आयसीटीच्या पायाभूत आराखड्याची सुरक्षा मजबूत करणे, इंटरनेटच्या सहाय्याने राज्यकारभार करतांना परस्पर चर्चा आणि सहभाग सुरु ठेवणे आणि या विषयाशी संबंधित सर्व भागीदारांच्या सक्रीय सहभागाला पाठींबा देणे अशा मुद्द्यांवर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.
* * *
B.Gokhale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1662368)
Visitor Counter : 220
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam