मंत्रिमंडळ
भारतीय प्राणि सर्वेक्षण संस्था आणि कॅनडातील इंटरनॅशनल बारकोड ऑफ लाइफ या समाजसेवी संस्थेदरम्यानच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
Posted On:
07 OCT 2020 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालया अंतर्गत असलेल्या झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (झेडएसआय) आणि आंतरराष्ट्रीय बारकोड ऑफ लाइफ (आयबीओएल) या कॅनेडियन समाजसेवी संस्थेदरम्यानच्या जून 2020 मध्ये झालेल्या सामंजस्य कराराबद्दल माहिती देण्यात आली.
डीएनए म्हणजेच गुणसूत्रांचे बारकोडींग करण्यासाठी झेडएसआय आणि आयबीओएल या संस्था एकत्र आल्या आहेत. बारकोडींग पद्धतीमुळे, विशिष्ट प्रजातींची त्वरीत आणि अचूक ओळख पटवणे सोपे जाते. त्या गुणसूत्रांचा छोटासा भाग वेगळा काढून, संदर्भ डेटाबेस शी त्याची तुलना केली जाते. आयबीओएल ही संशोधन संस्था असून, जे देश, जागतिक संदर्भ डेटाबेसचा विस्तार, विकास आणि माहितीचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच शोधकार्यासाठी, या संदर्भ संग्रहाचा वापर, त्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि जैवविविधतेचे वर्णन करण्यासाठी काही विश्लेषणात्मक प्रोटोकॉल वापरण्यासाठी मानवी आणि वित्तीय अशा दोन्ही स्वरूपाची संसाधने पुरवण्यास वचनबद्ध आहेत, असे देश या संस्थेच्या कार्यात सहभागी आहेत.
या सामंजस्य करारामुळे, झेडएसआयला बायोसन आणि प्लॅनेटरी जैवविविधता मोहिमेसारख्या जागतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल.
* * *
M.Chopade/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1662365)
Visitor Counter : 212
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam