भारतीय निवडणूक आयोग
बिहारमध्ये मुक्त, निष्पक्ष, सर्वसमावेशक आणि सुरक्षित निवडणुका आयोजित करण्याला प्राधान्यः मुख्य निवडणूक आयोग
Posted On:
05 OCT 2020 7:19PM by PIB Mumbai
आयोगाने बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षकांची आभासी आणि प्रत्यक्ष बैठक आयोजित केली
केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुकांसाठी तसेच विविध राज्यांमधील पोटनिवडणुकांसाठी तैनात केल्या जाणाऱ्या निरीक्षकांसाठी एक बैठक आयोजित केली, ज्याचे वेळापत्रक 25 सप्टेंबर, 2020 रोजी आणि त्यानंतर जाहीर करण्यात आले होते. आभासी आणि प्रत्यक्ष भेटीचा अनोखा मेळ असलेल्या या बैठकीत देशभरातील 119 ठिकाणांहून 700 हून अधिक जनरल, पोलिस आणि व्यय निरीक्षक आभासी माध्यमातून तर दिल्लीत तैनात असलेले सुमारे 40 निरीक्षक प्रत्यक्षरित्या सहभागी झाले होते.
निरीक्षकांशी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी कोविड-19 चा जगभरातील निवडणुकांच्या वेळापत्रकांवर होणारा परिणाम आणि बिहारमध्ये निवडणुका आयोजित करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या सविस्तर चर्चा आणि मुल्यांकनांबाबत दृष्टीकोन सांगितला. या निवडणुकांच्या आयोजनाबाबत अधिक सजग राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली कारण ही निवडणुक जगभरात महामारीच्या काळात होणारी जगातील सर्वात मोठी निवडणूक असल्यामुळे संपूर्ण जगाचे याकडे लक्ष असेल. मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक, नैतिक आणि कोविड सुरक्षित निवडणुका आयोजित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या कटिबध्दतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की लोकशाहीची ताकद तिचा प्राथमिक भागधारक म्हणजेच - मतदारांमध्ये निहित असते.
निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर येऊन मुक्तपणे आणि सुरक्षितपणे मतदान करण्याबाबत मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. स्थानिक निवडणूक यंत्रणेबरोबर निरीक्षकानीं मित्र आणि मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत त्यांना मार्गदर्शन करून समस्या सोडवण्यात मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काही विशेष व्यय निरीक्षकांनी दाखवलेली बांधिलकी आणि समर्पणाचे त्यांनी कौतुक केले. त्यांचे या क्षेत्रातील ज्ञान आणि निष्पक्षपणा यामुळे निवडणूक आयोगावरील विश्वास पुनर्स्थापित झाला आहे.
यावेळी बोलताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निरीक्षक म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांना वैधानिक कर्तव्य बजावायचे आहे याकडे त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की अधिका-यांनी नेहमीच हे लक्षात ठेवले पाहिजे की ते प्रत्यक्षात आयोगाचा वास्तविक चेहरा आहेत. त्यांनी या अधिकाऱ्यांना आठवण करुन दिली की बिहार निवडणुका जगासमोर दाखवल्या जाणे आवश्यक आहे कारण या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक यंत्रणांना मार्गदर्शन आणि सल्ला देण्यात निरीक्षक महत्वाची भूमिका निभावतात असे ते म्हणाले.
कोविड सुरक्षित निवडणुकांच्या अतिरिक्त आयामांवर आणि आयोगाने या विषयावर जारी केलेल्या व्यापक मार्गदर्शक सूचनांवर तसेच या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्यात निरीक्षकांनी पार पाडायची भूमिका यावर प्रत्येक सत्रात भर देण्यात आला.
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661815)
Visitor Counter : 198