संरक्षण मंत्रालय
88 वा हवाई दल वर्धापन दिन :हवाई प्रात्यक्षिके
Posted On:
02 OCT 2020 10:26PM by PIB Mumbai
हवाई दल आपला अभिमानास्पद 88 वा वर्धापन दिन येत्या 8 आँक्टोबर 2020 रोजी साजरा करणार आहे. हिंडन (गाझियाबाद) येथील हवाई दलाच्या स्थानकावरून विविध प्रकारच्या विमानांची चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके हे या हवाई दल दिनाच्या परेडचे आणि औपचारिक सोहळ्याचे वैशिष्ट्य असेल. कालपासून म्हणजे दिनांक 1 आँक्टोबर 2020 (गुरुवारपासून) या प्रात्यक्षिकांच्या सरावाला आरंभ झाला आहे. ही प्रात्यक्षिके वझीरपूर पूल -करवालनगर-अफजलपूर-हिंडन,- शामली- जिवाना-चंडीनगर-हापूर -फिलकुआ -गाझियाबाद- या भागात सर्वसाधारणपणे थोड्या खालच्या पातळीवरून होणार आहेत.
उडणाऱ्या विमानांना पक्ष्यांचा फार मोठा धोका असतो,विशेषतः खालच्या पातळीवरून उड्डाण करताना.मोकळ्या जागेत फेकून दिलेल्या खाद्यपदार्थांकडे पक्षी आकर्षित होतात. विमानांच्या,वैमानिकांच्या आणि मैदानावरील लोकांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय हवाई दलाने दिल्ली, गाझियाबाद आणि आजुबाजूच्या परीसरातील सर्व नागरिकांना खाद्यपदार्थ आणि कचरा मोकळ्या जागेत टाकू नये अशी विनंती केली आहे. तसेच त्यांना जनावरांचे सांगाडे/मृत जनावरे मोकळ्या जागेत सापडल्यास त्यांनी जवळच्या हवाई दल केंद्र/पोलिस स्थानकात जाऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नोंद करावी.शिवाय बर्ड हझार्ड काँम्बँट टीम (BHCT) च्या प्रभारी अधिकाऱ्यास 9559898964 या मोबाईलनंबरवर फोन/एसएमएस करावा.
सकाळी 8 वाजता आकाश गंगा पथक आपल्या AN-32 या विमानातून झेंडा घेतलेले स्काय डायवर्स (अवकाशातून उडी मारणारे) विविधरंगी वस्त्राच्या छत्रीतून आकाशातून खाली उडी मारतील.
या हवाई प्रात्यक्षिकांच्या वेळी प्राचीन काळातील विमाने,आधुनिक वाहतूक विमाने ,युद्धात वापरली जाणारी पहिल्या फळीतील विमाने ,सलामी देण्यासाठी सहभागी होतील.हा मंत्रमुग्ध करणारा प्रात्यक्षिकांचा सोहळा 10:52 वाजता संपेल.
विशेष सूचना: कृपया हा संदेश सुरक्षित उड्डाण वातावरण सुनिश्चित करण्यासाठी चौकटीत प्रकाशित करावा.
M.Iyangar/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661182)
Visitor Counter : 196