गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

स्वच्छतम् भारत, स्वास्थ्यतम् भारत-स्वच्छ आणि आरोग्यदायी  भारत  या  शपथेचा निग्रहाने  पुनर्उच्चार  करण्याची वेळ-हरदीप एस पुरी


77% विभागात कचऱ्याचे विलगीकरण ,67%विभागात कचऱ्यावर प्रक्रिया होत असून  वर्ष 2014 च्या 18% कचरा प्रक्रियांच्या तुलनेत यावर्षी चार पट जास्त कचऱ्यावर प्रक्रिया

12 कोटी नागरीकांचा स्वच्छ सर्वेक्षण 2020 मधे सहभाग

Posted On: 02 OCT 2020 8:26PM by PIB Mumbai

 

गृहनिर्माण आणि शहरीकार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) (I/C) MoHUA श्री. हरदीपसिंग पुरी आज म्हणाले, की आपण स्वच्छ भारत मिशन ( SBM-U)अभियानाला आज सहा वर्षे पूर्ण करत असून, आता आपण सर्वांनी मिळून घेतलेल्या स्वच्छतम भारत, स्वास्थ्यतम् भारत -जास्त स्वच्छ जास्त आरोग्यदायी भारताच्या शपथेचा निग्रहाने पुनर्रूच्चार करण्याची वेळ आली असून, सर्व शहरी भारतीय त्याचा हिस्सा असून जनआंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे. स्वच्छ भारत मिशन -शहर (SBM-U) या अभियानाच्या सहाव्या वर्धापनदिनी  (SBM-U) "स्वच्छता के 6 साल, बेमिसाल" या वेबिनारद्वारे संबोधित करताना श्री. पुरी म्हणाले की, या जनआंदोलनाचा आत्मा आणि जनभागिदारी ही सामूहिक कृतीची शक्ती आणि स्पर्धेची  निरोगी भावना  असून स्वच्छ सर्वेक्षण या गृहनिर्माण आणि शहरीनिवास मंत्रालयाच्या (MoHUA) वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणाची उत्तम उदाहरणे  आहेत.एसएस 2020 या सर्वेक्षणात 12 कोटी नागरीक सहभागी झाले होते.

या गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाने आयोजित केलेल्या वेबिनारमधे  या अभियानातील गेल्या सहा वर्षात झालेल्या राज्यातील, विविध शहरातील आणि तसेच  सहभागी संस्थांचे अनुभव सांगत केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला, तसेच महात्मा गांधी यांची 151वी जयंती देखील साजरी करण्यात आली.

यावेळी बोलतांना मंत्री महोदय म्हणाले,की 2014 मधे आदरणीय  पंतप्रधानांनी  2 ऑक्टोबर 2019 पर्यंत म्हणजे राष्ट्रपित्यांच्या 150व्या जयंतीपर्यंत  स्वच्छ भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एसबीएम -यू ( SBM-U) या अभियानाला प्रारंभ केला होता. आज मला अत्यंत अभिमान वाटत आहे आणि मी नम्रपणे सांगू इच्छितो की शहरातील प्रत्येक नागरीक हे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी एकत्र आला आहे.

गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाचे सचिव श्री. दुर्गा शंकर मिश्रा या कार्याचे तपशीलवार सादरीकरण करताना म्हणाले,की 2014 मधील  खुल्या शौचालय मुक्त (OPF) राज्यांपासून ते आज जवळपास  97% पेक्षा जास्त शहरे खुले शौचालय मुक्त  (OPF) झाली आहेत. 2014 मधे एसडब्ल्यूएम अभियानांतर्गत 18% घनकचऱ्यावर प्रक्रिया होत होती, तर आता 67% कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे आणि 77% विभाग कचऱ्याचे विलगीकरण करत आहेत. आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवणार असून येत्या काही वर्षांत त्यात भरीव वाढ होईल याची खात्री आहे.

गेल्या सहा वर्षांत अनेक डिजिटल नवनवीन कल्पनांमुळे स्वच्छता वितरण सेवेत आश्चर्यकारक बदल घडून आले आहेत -ज्यात मुख्य महत्त्वाचे म्हणजे स्वच्छता अॅप,नागरीकांचे कचऱ्याबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे अँप,एसबीएम टाँयलेट्स आँन द गूगल मँप, ज्यावरून लोकांना जवळच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे स्थान लक्षात येते आणि स्वच्छता मंच,हा डिजिटल मंच ज्याद्वारे नागरिकांच्या स्वच्छतेच्या आणि तत्सम  कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचते.

या सर्व प्रकारच्या प्रयत्नांद्वारे हे अभियान नागरीकांपर्यंत पोहोचवले गेले आणि त्याचा परीणाम म्हणून  कोट्यावधी नागरीक त्यात प्रत्यक्ष सहभागी झाले , शेवटच्या स्वच्छ सर्वेक्षणात 12कोटींपेक्षा जास्त नागरीक त्यात प्रत्यक्ष सहभागी झाले, तर आदरणीय पंतप्रधानांच्या एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिक पासून भारताला मुक्त करण्याच्या स्वच्छता हीच सेवा,या  2019 च्या अभियानात 7 कोटीपेक्षा जास्त नागरीक सहभागी झाले होते.

मिशनच्या पुढील कार्याचा सारांश सादर  करतांना मंत्रीमहोदय म्हणाले, जरी आपण गेल्या काही वर्षांत केलेले कार्याबद्दल अभिमान बाळगला तरी, प्रवास नुकताच सुरू झाला आहे. सरकारच्या सर्वांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या उद्दिष्टासोबतच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून  तसेच विष्ठा कचरा  व्यवस्थापन ,सांडपाण्यावर प्रक्रिया  करून त्याचा पुनर्वापर करून आपल्या जलाशयांचे आपण  संरक्षण केले पाहिजे. स्वच्छ भारत मिशन भागांत एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकचा वापर  जेवढा टाळता येईल तेवढा टाळण्यावर , कचरा तयार होणे आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रक्रिया करण्याचे प्रयत्न वाढवूनजैविक कचराकुंड्यांची गरज (लिगसी) वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहाण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. गेल्या सहा वर्षांतील उत्तम कामगिरीमुळे या अभियानाने स्वच्छ, स्वस्थ, सशक्तसमृध्द आणि आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात नव्या लेख लिहिण्याची सुरूवात  केली आहे.

****

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1661128) Visitor Counter : 127