जलशक्ती मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शन  आणि नेतृत्वाखाली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या हस्ते शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठासाठी 100 दिवसांच्या अभियानाचा प्रारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यांना सार्वजनिक संस्थांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ाची व्यवस्था करण्यासाठी 100 दिवसांच्या मोहिमेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन

Posted On: 02 OCT 2020 6:03PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दूरदर्शी नेतृत्वात देशभरातील बालकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी देण्याच्या उदात्त प्रयत्नांसह, केंद्रीय जल शक्ती गजेंद्रसिंग शेखावत यांनी आज देशभरातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 100 दिवसांच्या  विशेष अभियानाचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी 29 सप्टेंबर 2020 रोजी जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीसंदर्भात ग्रामपंचायती आणि पाणी समित्यांसाठी मार्गदर्शिकेचे प्रकाशन करताना या अभियानाची संकल्पना मांडली होती. पंतप्रधान म्हणाले की, 2 ऑक्टोबर 2020 पासून देशभरातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळांमधून शुद्ध पाणी मिळावे यासाठी ‘100 दिवसांची मोहीमसुरू करावी. सार्वजनिक संस्थांमध्ये नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जावे यासाठी या मोहिमेचा अधिकाधिक उपयोग करण्याचे आवाहनही त्यांनी राज्यांना केले होते. बालकांना जलयुक्त आजारांची लागण होण्याची जोखीम जास्त असल्यामुळे त्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देणे याला प्राधान्य आहे, म्हणून शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य सेवा केंद्रांमध्ये नळाच्या पाण्याद्वारे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत तरतुदी केल्या आहेत.

राष्ट्रीय जल जीवन अभियान राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचले आहे, यातून हे सुनिश्चित करण्यात येत आहे की, या मोहिमेदरम्यान, पुढच्या 100 दिवसांत गावातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि इतर सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा ठराव संमत करण्यासाठी ग्रामसभा लवकरात लवकर बोलावण्यात येतील. ही मोहीम बालकांसाठी सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने दूरगामी परिणाम करणारी आणि त्यांच्या आरोग्यावर आणि एकूणच विकासावर सकारात्मक परिणाम करणारी ठरेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त त्यांना ही योग्य आदरांजली आहे.

जल जीवन मिशन (JJM) चे उद्दीष्ट 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळ जोडणी देणे आहे. या मोहिमेअंतर्गत महिला आणि बालकांवर विशेष लक्ष दिले जात आहे.

या अभियानात सर्व गंभीर समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आहे आणि सर्व ग्रामपंचायती किंवा त्यांच्या उप-समितीने या अभियानामध्ये भाग घ्यावा जेणेकरुन हे अभियान यशस्वी होईल.

*****

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1661121) Visitor Counter : 218