मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

केंद्रीय मस्त्यसंपदा, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते ‘मत्स्यसंपदा’ वार्तापत्राची दुसरी आवृत्ती आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या लाभांची सर्वंकष माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित

प्रविष्टि तिथि: 30 SEP 2020 7:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  30 सप्टेंबर  2020

केंद्रीय मत्स्यसंपदा, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते आज मस्त्यसंपदा’ या वार्तापत्राची दुसरी आवृत्ती आणि प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या लाभांची सविस्तर माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत, PMMSY योजनेअंतर्गत मत्स्यव्यावसायिकांना मिळणारे लाभ आणि योजनेतील सर्व उपक्रमांची माहिती दिली जाते. तसेच या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही यात सविस्तरपणे देण्यात आली आहे. ही पुस्तिका, मच्छिमार आणि या क्षेत्रातील इतर हितसंबंधीयांसाठी एक महत्वाचा स्त्रोत ठरु शकेल. ही पुस्तिका, सर्व लाभार्थी आणि इतरांसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरेल. तसेच या अंतर्गत सुरु असलेले विविध उपक्रम आणि अभियानांची माहिती देखील त्यातून मिळू शकेल, असा विश्वास गिरीराज सिंह यांनी व्यक्त केला.

PMMSY योजनेचे उद्दिष्ट देशातील मत्स्य उत्पादन वर्ष 2024-25 पर्यंत 220 लाख टन पर्यंत वाढवणे हे आहे. मस्त्यसंपदा विभागाचे वार्तापत्र हा मच्छिमार आणि मत्स्य शेती करणाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा उपक्रम आहे. PMMSY या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मत्स्यसंपदेच्या निर्यातीतून मिळणारे उत्पन्न दुप्पट म्हणजेच.1,00,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणे हे असेल तसेच यातून येत्या पाच वर्षात या क्षेत्रात 55 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होईल, असेही ते म्हणाले. 

इंग्रजीमधील वार्तापत्र बघण्यासाठी येथे क्लिक करा

हिंदीमधील वार्तापत्र बघण्यासाठी येथे क्लिक करा

 

B.Gokhale/R.Aghor/ P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1660421) आगंतुक पटल : 150
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Punjabi , Tamil , Telugu