आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात नवीन रूग्णसंख्येपेक्षा बऱ्या झालेल्या रूग्णांची संख्या गेल्या कित्येक दिवसांपासून अधिक


21 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांत नवीन रूग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची नोंद

प्रविष्टि तिथि: 27 SEP 2020 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  27 सप्टेंबर  2020

 

भारतात  सतत गेल्या नऊ दिवसांपासून नविन रूग्णसंख्येपेक्षा बऱ्या झालेल्या रूग्णांची संख्या  वाढत आहे.बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत उच्चांकी  वाढ होत आहे.एका दिवसात बरे झालेल्या रूग्णांची सरासरी  संख्या 90,000 पेक्षा जास्त आहे.

देशात गेल्या 24 तासात 92,043  रुग्ण बरे झाल्याची  नोंद झाली आहे तर नव्या सक्रीय रूग्णांची संख्या 88,600 इतकी आहे. यासोबत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 50 लाख (49,41,627) इतकी आहे. रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर सततची वाढ कायम राखत  82.46% इतका आहे.

ह्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणामुळे भारत रुग्ण बरे होण्याच्या जागतिक क्रमवारीत सतत उच्च स्थानावर आहे.

नवीन रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याचा दर जास्त असल्याने बरे झालेले रूग्ण आणि नवीन सक्रीय रूग्ण यातील फरक सतत वाढत आहे. सक्रिय रूग्ण आणि बरे झालेले रूग्ण यातील फरक जवळपास 40 लाख (39,85,225) इतका आहे.

सक्रीय रूग्णांची संख्या सतत कित्येक दिवसांपासून 10 लाखांपेक्षा कमी आहे. सक्रीय  पॉझिटीव्ह रूग्णांचे प्रमाण  15.96%इतके असून ते सतत कमी होत आहे.

केंद्रात आणि राज्यसरकार/केंद्रशासित प्रदेशात सक्रीय,आणि परीणामकारक समन्वय साधल्यामुळे एका दिवसात बरे होण्याच्या रुग्णांत सतत वाढ राखणे शक्य झाले आहे.

21 राज्ये /केंद्रशासित प्रदेशात रुग्ण बरे होण्याचा दर नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे.

हा परिणाम केंद्र सरकारच्या सतत सुरु असलेल्या गुणवत्तापूर्ण आणि परीणामकारक उपाययोजना आणि त्यांचे सतत पुनरावलोकन करणे यामुळे गाठणे शक्य झाले आहे.लवकरात लवकर रुग्णाची ओळख पटवून देशभरात चाचण्या, काळजीपूर्वक सावधानता आणि त्यासोबत प्रमाणित वैद्यकीय मदत यामुळे अशा प्रकारचे उत्साहवर्धक यश मिळाले आहे.

 

M.Chopade/S.Patgoankar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1659563) आगंतुक पटल : 212
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Telugu , Malayalam