युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
नेहरू विकास केंद्रांनी, राष्ट्रीय पोषण मासानिमित्त, पोषण अभियानाअंतर्गत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त 'पोषक-आहार' संबंधित कार्यक्रम केले आयोजित
Posted On:
27 SEP 2020 10:16AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2020
2018 सालापासून पोषण अभियानांतर्गत (पंतप्रधानांची सर्वदूर पोचणारी सर्वंकष पोषणासाठी योजना) दरवर्षी सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण मास म्हणून साजरा केला जातो. युवाकल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने, दिनांक 1 सप्टेंबर 2020 पासून त्यादृष्टीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. देशभरात पोषण महिना हा पोषण संकेतांना गतिमानता आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साजरा केला जातो.
युवा कल्याण विभागाचे, नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) गेल्या दोन वर्षांपासून सप्टेंबर महिन्यात देशभरात राष्ट्रीय पोषण महिना (राष्ट्रीय पोषण माह) साजरा करत आहे."घराघरात पोषण उत्सव"( हर घर पोषण त्योहार) हा संदेश पुढे नेला जात आहे. राष्ट्रीय पोषण मासानिमित्त जिल्हा नेहरू युवा केंद्रांनी राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांद्वारे,युवा क्लबचे सदस्य , कोविड स्वयंसेवक, गंगादूत आणि इतर नेहरू युवा संघटना (NYKS)यांना प्रोत्साहित करत कुपोषण, स्तनपानाचे महत्त्व, स्वयंपाक घरातील बाग (परसबाग), याबाबत जिल्हा प्रशासनासोबत अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यांसमवेत गावकऱ्यांमधे संवेदनशीलता जागृत करण्यासाठी प्रयत्न हाती घेतले आहेत.
केंद्रीय युवाकल्याण आणि क्रीडा मंत्री श्री.किरण रिजिजू म्हणाले, की नेहरू युवा कल्याण संघटना (NYKS) ही जगातील सर्वात मोठी तरुणांची संस्था आहे. यातील युवा स्वयंसेवक सतत शिक्षण, आरोग्य , स्वच्छता , पर्यावरण, सामाजिक विषयांवर जनजागृती , महिला सक्षमीकरण आणि नागरी शिक्षण यासारख्या अनेक चळवळींमार्फत राष्ट्र बांधणीच्या कामात व्यस्त असतात. सप्टेंबर महिन्यात आम्ही पोषण माह साजरा करत असून घराघरांत पोषण उत्सव (हर घर पोषण त्योहार)हा संदेश पुढे नेत आहोत. याचे उद्दिष्ट आयुष्यभर निरोगी रहाण्यासाठी आरोग्यपूर्ण आणि पोषक आहार आवश्यक आहे,याबाबत जागृती निर्माण करणे ,विशेष करून ग्रामीण भागात, हे आहे.
यासाठी पोषण महिन्यात एकूण 1,04,421 उपक्रम हाती घेण्यात आले ज्यात 51,02,912 युवक आणि गावकऱ्यांनी भाग घेतला.या महामारीत आणि त्यानंतर अत्यंत कुपोषित मुलांसाठी ,कुपोषणावर मात करण्यासाठी, वेगवेगळ्या कुशल तज्ञांच्या कुपोषण प्रतिबंध , उत्तम पध्दती आणि यशोगाथा अशा विविध विषयांवर आधारित 1,125 वेबिनार्स आयोजित करण्यात आल्या.
युवकांची आणि गावकऱ्यांची पोषणाच्या (Nutrition) मूलभूत विषयांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले. 74,213 गावांत पोषक आहाराच्या महत्वाच्या पैलूंबाबत डिजिटल साहित्यासह फलक आणि प्रसिध्दी साहित्य दर्शविण्यात/वाटण्यात आले.
शारीरिक अंतराचे पालन करीत 36,274 युवकांच्या प्रतिष्ठित नागरीकांसोबत 1862 सभा घेण्यात आल्या.25164 शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आले, ज्यातून 6,54,320 युवकांनी पोषणासाठी शपथ घेतली. पोषण माह निमित्त सामाजिक माध्यमाच्या मंचावरून 38 लाख लोकांना संदेश पाठविण्यात आले,ज्यांचा युवकांना आणि गावकऱ्यांना फायदा झाला.
29,057 रँलीज, धावयात्रा, पदयात्रा, सायकल यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, लघूपट महोत्सव, प्रदर्शने, पथनाट्ये (नुक्कडनाटक), स्पर्धा (प्रश्नमंजूषा, पोस्टर चित्रे, निबंध, घोषवाक्य, भित्तिचित्रे,) असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
जिल्हा नेहरू युवा केंद्रांनी पोषणमाह उपक्रम आयोजित करताना,युवकांना फेस मास्क्सचा वापर,सँनिटायझरने वारंवार हात धुणे ,वैयक्तिक स्वच्छतेची काळजी आणि शारीरिक अंतराचे पालन, तसेच सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यासाठी विशेष दक्षता घेतली होती. तसेच कार्यक्रम करण्यापूर्वी स्थानिक जिल्हा प्रशासनाला सूचना देऊन त्यांची परवानगी देखील घेतली होती.
पोषण माह 2020 अंतर्गत केले गेलेले उपक्रम:
- अत्यंत कुपोषित बालकांना ओळखून त्यांचा पाठपुरावा करणे (SAM), स्वैपाकघरातील बाग याविषयी चळवळीला प्रोत्साहन देणे.
- अत्यंत कुपोषित बालकांबाबत दर्शनी/लवकरात लवकर , डिजिटल मंचांचा वापर करत, समुदायातील लोकांची संवेदनशीलता वाढविण्यासाठी ,युवा स्वयंसेवकांच्या पथकांना उदाहरणार्थ एनवायएसकेंना सक्षम करणे.
- फिट इंडिया चळवळीसोबत डिजिटल जागरूकता वाढविणे,एफएसएस एआय सोबत (FSSAI)अन्नाचा दर्जा वाढविण्यासाठी अभिसरण करणे
- याव्यतिरिक्त पोषण, चांगली स्वच्छता, आरोग्यासाठी उत्तम सवयी, आणि अन्नातील परीणामकारक विविधता याबाबत संवेदनशीलता वाढविणे.
- आपल्या परीसरात/विभागात पोषक झाडांची लागवड करण्यासाठी प्रयत्नशील रहाणे.
R.Tidke/S.Patgoankar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659553)
Visitor Counter : 376