पंतप्रधान कार्यालय

सीएसआयआरच्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांकडून वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

Posted On: 26 SEP 2020 4:51PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएसआयआर अर्थात शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सीएसआयआरच्या वर्धापनदिनी या संस्थेशी संबंधित असलेल्या सर्वांना शुभेच्छा देत असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे. भारतात शास्त्रीय संशोधन आणि नवनिर्मिती क्षेत्रामधील सीएसआयआर ही एक अग्रणी संस्था आहे. कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठी ते अतिशय मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी सदिच्छा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Greetings to all those associated with @CSIR_IND on its Foundation Day. CSIR is at the forefront of furthering scientific research and innovation in India. They have also been playing a valuable role in fighting COVID-19. Best wishes to CSIR for its future endeavours.

— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2020

****

B.Gokhale/S.Patil/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659323) Visitor Counter : 97