आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालयामार्फत कामाच्या ठिकाणी आजपासून "योग ब्रेक"ला सुरूवात
Posted On:
25 SEP 2020 2:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2020
आयुष मंत्रालयामार्फत राबवण्यात आलेला “योग ब्रेक” आजपासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. कोविड - 19 प्रोटोकॉल सुरू झाल्यानंतर काही काळासाठी हा उपक्रम बंद करण्यात आला होता. पाच मिनिटांचा हा प्रोटोकॉल कामाच्या ठिकाणी असलेल्या लोकांना योगाचा परिचय करून देणे आणि त्यांना कामाच्या वेळापत्रकातून विश्रांती घेण्यात मदत करण्यासाठी, उत्साही करण्यासाठी आणि कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने योगासाठी 5 मिनीटे हा उपक्रम सुरू करण्यात आला.
योग एक प्राचीन भारतीय कला आहे. व्यक्तीच्या जीवनात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक संतुलन घडवून आणण्यास योगाची मदत होते. कामाच्या सवयी बदलल्यामुळे, विशेषत: संगणकावर आणि बर्याच तास सतत बसून काम केल्यामुळे कामाचा ताण जाणवतो. अशा तणावामुळे कामावरील लक्ष विचलित होते. ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता यात आणखी अडथळा येऊ शकतो.
एमडीएनआयवायच्या संयुक्त विद्यमाने आयुष मंत्रालयाने 2019 मध्ये कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी, त्यांना ताजेतवाने वाटण्यासाठी आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 5 मिनिटांचा "योग ब्रेक" प्रोटोकॉल सुरू केला.
प्रख्यात योग तज्ञांच्या गटाने तयार केलेल्या या प्रोटोकॉल मध्ये ताडासन, कटी चक्रासन, इत्यादी आणि नाडीशोधन, भ्रामरी प्राणायाम आणि ध्यान यासारख्या काही योगपद्धतींचा समावेश आहे. प्रोटोकॉल सुरुवातीला जानेवारी 2020 मध्ये प्रयोगीक तत्वावर सुरू करण्यात आला होता आणि सहभागींच्या अभिप्रायाच्या आधारावर प्रभावी असल्याचे आढळून आले होते.
आयुष मंत्रालयाने आज पुन्हा प्रात्यक्षिक सुरू केले आणि आयुष भवनात आणि नवी दिल्लीतील एमडीएनआयवाय कॅम्पस येथे योग ब्रेक (वाय-ब्रेक) प्रोटोकॉलचा सराव केला. सध्याच्या आरोग्य विषयक परिस्थितीचा विचार करता, फुफ्फुसांची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने, श्वासोच्छवासाच्या व्यायामावर अधिक भर दिला गेला. आयुष भवनच्या लॉनमध्ये ही प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण दररोज दहा मिनिटे सुरू राहणार आहे आणि आजूबाजूच्या परिसरातील विविध कार्यालयांमधील सहभागींनी यामध्ये सामील होण्यासाठी नावनोंदणी केली आहे. सामाजिक अंतराच्या निकषांचे आणि सरकारच्या इतर मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. आयुष मंत्रालय येत्या आठवड्यात ही सुविधा जीपीओ कॉम्प्लेक्स, आयएनए, नवी दिल्ली येथे असलेल्या विविध कार्यालयांच्या कर्मचार्यांना व अधिकाऱ्यांना मोफत देईल.
* * *
U.Ujgare/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658962)
Visitor Counter : 283
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Tamil
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam