संरक्षण मंत्रालय
भारतीय सैन्यातील महिला अधिकाऱ्यांना स्थायी स्वरूपाचे कमिशन बहाल करणाऱ्या निवड समितीचे काम सुरू
Posted On:
19 SEP 2020 2:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2020
भारतीय लष्करात स्थायी स्वरूपाचे कमिशन महिला अधिकाऱ्याना देण्यासाठी स्त्री अधिकाऱ्यांचे परिक्षण करणाऱ्या पाच क्रमांकाच्या विशेष निवड समितीने लष्कराचा हेडक्वॉर्टरस मध्ये 14 सप्टेंबर 2020 पासून आपल्या कामकाजाला सुरुवात केली. वरिष्ठ जनरल दर्जाचे अधिकारी या समितीचे प्रमुख आहेत. तसेच त्यामध्ये ब्रिगेडियर पदावरील महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महिला अधिकाऱ्यांना या परिक्षणाचे अवलोकन करण्याची अनुमती देण्यात आली आहे, जेणेकरून या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाईल.
या परीक्षण प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना किमान स्वीकारार्ह वैद्यकीय गटानुसार स्थायी स्वरूपाचे कमिशन बहाल केले जाईल.
* * *
R.Tidke/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656629)
Visitor Counter : 170