पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती तसेच श्रीलंकेचे पंतप्रधान यांच्यामध्ये दूरध्वनीव्दारे संभाषण
Posted On:
17 SEP 2020 11:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2020
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्शे तसेच श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्शे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छा दिल्या.
श्रीलंकेच्या या दोन्ही नेत्यांनी शेजारी देशांमध्ये असलेले संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा आणि वचनबद्धता व्यक्त केली. त्यांनी कोविड-19 महामारीच्या विरोधात संयुक्त लढा देण्यासाठी व्दिपक्षीय सहयोग निरंतर मिळत असल्याबद्दल कौतुक केले.
पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेच्या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद व्यक्त केले आणि भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ - अर्थात, सर्वप्रथम शेजारधर्म या धोरणानुसार उभय देशांमध्ये सहकार्याचा भविष्यात अधिक विस्तार करण्यासाठी त्यांच्याबरोबर कार्य करण्यास तत्पर असल्याचे सांगितले.
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656124)
अभ्यागत कक्ष : 237
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam