नागरी उड्डाण मंत्रालय

पोर्ट ब्लेअर विमानतळावर नवीन टर्मिनल बिल्डिंग


प्रवासी हाताळण्याची वार्षिक क्षमता 50 लाखांपर्यंत वाढेल

Posted On: 16 SEP 2020 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, पोर्ट ब्लेअर येथे लवकरच नवीन टर्मिनल इमारत होणार आहे. विमानतळ सध्या वर्षाकाठी 18 लाख प्रवाशांना हाताळत आहे. प्रवाशांच्या वाहतुकीत होणारी वाढ लक्षात घेऊन विमानतळ प्राधिकरणाने नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगसाठी 700 कोटी लाख रुपये खर्च करून काम सुरू केले आहे.

नवीन टर्मिनल इमारत, गर्दीच्या वेळेस 1200 प्रवासी आणि वर्षाकाठी सुमारे 50 लाख प्रवासी हाताळण्यास सक्षम असेल. 

जागतिक दर्जाची ही इमारत पूर्णपणे वातानुकूलित आहे आणि प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.  या सुविधांमध्ये 28 चेक-इन काउंटर, तीन पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज, इन-लाइन स्कॅन सिस्टमसह पाच कन्व्हेयर बेल्ट आणि अत्याधुनिक फायर फायटिंग आणि फायर अलार्म सिस्टमचा समावेश आहे.

विमानतळालगतच्या भागात लँडस्केपींगसह कार, टॅक्सी आणि बससाठी पार्किंगची पुरेशी सुविधा देखील विकसित केली जाईल. 

निसर्गापासून प्रेरणा घेऊन टर्मिनलची रचना ही शिंपल्याच्या आकाराची असून समुद्र आणि बेटांचे वर्णन दर्शवते.

नवीन टर्मिनल इमारत ही स्ट्रक्चरल स्टील फ्रेमची इमारत आहे ज्यावर अँल्युमिनियमचे छप्पर आणि चारही बाजूंनी केबल नेट ग्लेझिंगची व्यवस्था बसवण्यात आली आहे.

या विमानतळाचे 65% हून अधिक काम पूर्ण झाले आहे आणि पुढील वर्षाच्या म्हणजेच 2021मध्यापर्यंत पोर्ट ब्लेअरची नवीन टर्मिनल इमारत तयार होणार आहे.

  

Work in progress –Terminal Building                              Work in progress –Terminal Building

  

Perspective of City Side Elevation

 

* * *

M.Chopade/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1655074)