ऊर्जा मंत्रालय

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून ऐतिहासिक ग्राहक केंद्री विद्युत मसुदा, (ग्राहक हक्क) नियमावली, 2020 तयार


विद्युत जोडणीसाठी सरल पद्धतीची शिफारस दहा किलो वॅट भारपर्यंतच्या जोडणीसाठी फक्त दोन कागदपत्रांची पूर्तता आवश्यक

वीजबिल वितरणासाठी सात दिवस किंवा त्याहून जास्त काळ लागला तर दोन ते पाच टक्के सूट

प्रोझ्युमर ही ग्राहकांची नवीन श्रेणी

सर्वसामान्य सेवा देण्यासाठी 24 X 7 टोल फ्री कॉल सेंटर , इंटरनेट आधारित आणि मोबाईल ॲप या सुविधा

Posted On: 16 SEP 2020 12:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020


वीजग्राहकांचे हित रक्षण करणारे आणि त्यांना काही अधिकार बहाल करणाऱ्या नियमावलीचा मसुदा केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने प्रथमच तयार केला आहे. उर्जा क्षेत्रात विद्युत ग्राहक हा महत्त्वाचा घटक आहे. विद्युत क्षेत्राचे अस्तित्वच त्यावर आधारित आहे. त्यामुळे सर्वांना विद्युत पुरवठा करतानाच ग्राहकाचे हित सर्वोच्च आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी या क्षेत्रातील तातडीच्या सेवा त्यांची संख्या कमीत कमी असण्यावर आणि त्यांचा दर्जा राखण्यावर भर देणे, त्या सेवा देताना ग्राहकांचा हक्क हे लक्ष्य असणे  या बाबी महत्त्वाच्या आहेत.  याच उद्देशाने विद्युत मसुदा (ग्राहक हक्क) नियमावली 2020 ही प्रथमच सरकारने तयार केली आहे.

मुख्य वैशिष्ट्ये:-

  • खात्रीशीर सेवा:  विद्युत पुरवठ्यात खंड पडण्याचा कालखंड प्रति ग्राहक , प्रतिवर्ष  सरासरी किती असावा याची SERC कडून निश्चिती.
  • जोडणीसाठी कालबद्ध आणि सरल पद्धती दहा किलो वॅट पर्यंत विद्युत भाराच्या जोडणीसाठी फक्त दोन कागदपत्रांची गरज तसंच  जोडणीत वृद्धी करताना  दीडशे किलो वॅट पर्यंत पुरवठा दराच्या अनुमानाची गरज नाही.
  • नवीन जोडणी किंवा जुन्या जोडणीत बदल करण्यासाठी महानगरात सात दिवसांची इतर महापालिका क्षेत्रात पंधरा दिवसांची तर ग्रामीण भागात तीस दिवसांची कालमर्यादा निर्धारित.
  • वीज बिल वितरणासाठी साठ किंवा त्याहून जास्त दिवसाचा विलंब झाल्यास दोन ते पाच टक्के सूट.
  • हजार किंवा त्याहून जास्त रकमेची बिले ऑनलाइन भरता येतील बाकी बिलांसाठी रोख, चेक, डेबिट कार्ड, नेट बँकिंग इत्यादी पर्याय खुले राहतील.
  • जोडणी काढणे पुनर्जोडणी, मीटर बदलणे, बिलिंग तसेच पैसे भरणा इत्यादीसाठी सुविधा
  • प्रोसुमर ही ग्राहकांची नवीन श्रेणी असेल जे ग्राहक विद्युत ग्राहक आहेत आणि त्याशिवाय त्यांनी सौर ऊर्जा निर्मितीचे छतावरील युनिट बसवले असेल किंवा सौर ऊर्जेवर चालणारा पंप सिंचनासाठी वापरात असतील असे ग्राहक त्यांना स्वतःच्या वापरासाठी वीज निर्मिती करण्याचा हक्क आहे आणि त्याच वेळी SERCने निर्धारित केलेल्या मर्यादेपर्यंत ऊर्जा ग्रीडला पुरवता येईल.
  • नवीन जोडणी, जोडणी काढणे, पुनर्जोडणी, जोडणी हलवणे, नाव वा तत्सम माहितीत बदल, विद्युत भाराबद्दल, मीटर बदलणे, वीज पुरवठा नसणे या आणि अशा तक्रारींसाठी 24X7 टोल फ्री, कॉल सेंटर, इंटरनेट आधारित आणि मोबाईल ॲप. या तक्रारींसाठी एसएमएस किंवा मेल पाठवून तसंच ऑनलाईन माहितीची पडताळणी करणे तसेच प्रमाणित करणे अशा सुविधा.
  • ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ग्राहक तक्रार निवारण संस्था असेल त्यामध्ये तक्रार कर्त्याला सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक पातळीवर  दोन ते तीन ग्राहकप्रतिनिधींची नेमणूक होईल.
  • नियमांचा हा मसुदा ऊर्जा मंत्रालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केला आहे आणि त्यावर सूचना मते आणि विचार मागवले आहेत. अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2020 आहे यादरम्यान मिळालेल्या सर्व सूचना लक्षात घेऊन त्यानंतर हा मसुदा अंतिम केला जाईल.

विद्युत मसुदा (ग्राहक हक्क) नियमावली 2020 पीडीएफ बघण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

U.Ujgare/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654904) Visitor Counter : 181