सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

खादीचे ई-मार्केट झाले व्हायरल ; 'गो व्होकल फॉर ग्लोबल' ची अंमलबजावणी

Posted On: 09 SEP 2020 3:18PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

 

खादी आणि ग्रामोद्योगचा (KVIC)आँनलाईन विक्री करण्याचा उपक्रम संपूर्ण भारतभर वेगाने स्थिरस्थावर होत असून ,त्यायोगे कारागिरांना त्यांच्या उत्पादनांची विक्री भारताच्या दूरवरच्या भागात www.kviconline.gov.in/khadimask/.  या पोर्टलद्वारे करणे साध्य झाले आहे. यावर्षीच्या 7 जुलैला खादीच्या  मास्क्सची  ईमंचाद्वारे ,नलाईन  विक्री सुरु करत, ती वाढवत जात, आजपर्यंत 180  उत्पादने विक्रीसाठी  बाजारपेठेत उपलब्ध केली असून,आणखी बरीच येणार आहेत.

खादी ग्रामोद्योगाच्या उत्पादनांत, हातमागाचे आणि हाताने विणलेले मलमल,रेशीम, डेनीम,सुती कापड, रीतू बेरी यांचे युनिसेक्स वस्त्र, खादीची खास मनगटी घड्याळे, विविध प्रकारचे मध, वनौषधी आणि ग्रीन टी हे चहाचे प्रकार ,वनौषधी साबण, पापड, घाण्यावर गाळलेले मोहरीचे तेल, वनौषधीयुक्त सौंदर्यप्रसाधने यांसह अनेक उत्पादनांचा समावेश आहे. केव्हीआयसी आँनलाईन उत्पादनांच्या यादीत  दररोज कमीत कमी 10 नव्या उत्पादनांचा समावेश  करत असून आणि येत्या 2 क्टोबर पर्यंत त्यांची संख्या 1000 पर्यंत नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.दोन महिन्यांच्या आत केव्हीआयसीने 4000 ग्राहकांना सेवा पुरविली आहे.

केव्हीआयसीचे अध्यक्ष श्री. विनयकुमार सक्सेना म्हणाले, की खादी उत्पादनांच्या आँनलाईन विक्रीमुळे स्वदेशीला प्रोत्साहन मिळत असून, स्थानिक कारागिरांना सक्षम करणे हा त्याचा हेतू आहे.खादीच्या ई मार्केट पोर्टलमुळे आमच्या कारागिरांना आपली उत्पादने विकण्यासाठी आणखी एक मंच मिळाला आहे. हे  आत्मनिर्भर भारताच्या द्रुष्टीने ठोस पाऊल  उचललेले  आहे, असे सांगत  श्री.सक्सेना पुढे म्हणाले,की सर्व प्रकारच्या ग्राहकांना आपल्या आवडीची आणि  परवडणारी उत्पादने मिळावीत, यासाठी उत्पादनांच्या किमतीची मूल्यश्रेणी 50 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत आहे.

यापूर्वी ही उत्पादने खादीच्याच दुकानांतून विकली जात होती ,त्यामुळे काही थोड्या राज्यांतच ती दिसत. परंतु आतामात्र केव्हीआयसीच्या ई पोर्टलमुळे  ती देशातील दूरदूरच्या भागांतही पोचत आहेत त्यामुळे त्यांच्या बाजारपेठेचे क्षितिज विस्तारत असून त्यायोगे खादीच्या संस्थांचे उत्पादन वाढून कारागिरांचे उत्पन्न वाढेल.

ग्राहकांनी देखील  या आँनलाईन विक्रीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दिल्लीतील कँनाँट प्लेस विभागात खादीच्या दुकानातून खरेदी करणाऱ्या एका ग्राहकाची आसाममध्ये नियुक्ती झाल्यावर त्यांना तेच उत्पादन तेथे मिळत नव्हते. परंतु ई -मार्केट मंचाच्या  आँनलाईन विक्रीमुळे त्यांना हवे असलेले उत्पादन  घरपोच मिळाले.

केव्हीआयसीला अंदमान निकोबार या बेटांपासून, अरुणाचल प्रदेश, केरळ,हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर सह 31 राज्यांतून आँनलाईन आँर्डरी   येतात. केव्हीआयसी मोफत  वितरण करण्यासाठी कमीत कमी 599 रुपयांची उत्पादनाची आँर्डर स्विकारते. पाठविलेल्या वस्तूसाठी त्यांनी टपाल खात्यासोबत  करार केला असून स्पीडपोस्टने ती वस्तू पाठविण्यात येते.

केव्हीआयसीने स्वतःचे  ई-पोर्टल स्वतःच विकसित केले असून त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा महसूल वाचला आहे. हे पोर्टल प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ( प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम PMEGP)या सारखे  असून संकेतस्थळाचा विकास आणि परीरक्षणावरील खर्चापोटी कमीत कमी  20 कोटी रुपये वाचले आहेत.

केव्हीएसच्या नलाईन उत्पादनांच्या यादीत मोदी कुर्ता आणि जाकिटे आणि स्त्रियांसाठी घोळदार (पलाझो)आणि सरळ  विजारी आहेत. याशिवाय खादीचे रुमाल, मसाले, वनौषधी युक्त कडुनिंबाच्या लाकडाचे कंगवे,शाम्पू ,सौंदर्य प्रसाधने, गायीच्या शेण आणि  मुत्रापासून बनविलेले साबण ,योग वस्त्रे तसेच झटपट खाण्याचे पदार्थ आहेत.

 

 U.Ujgare/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1652616) Visitor Counter : 213