संरक्षण मंत्रालय
हवाई दल प्रमुखांची (CAS) पूर्व हवाई विभागातील सीमेवरच्या हवाईतळांना भेट
Posted On:
03 SEP 2020 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2020
हवाईदल प्रमुख (CAS) एअर चीफ मार्शल, आर के एस भदौरीया यांनी काल म्हणजेच 2 सप्टेंबर 2020 रोजी पूर्व हवाई विभागातील सीमेवरच्या हवाईतळांना भेट दिली.
पूर्व हवाई विभागात हवाई दलांचे आगमन झाल्यावर, या विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, त्यांच्या विभागाच्या अखत्यारीतील तुकड्यांची सद्यस्थिती आणि ऑपरेशनविषयक सज्जता, याविषयी माहिती दिली. हवाईदलप्रमुखांनी यावेळी, या तुकड्यांमधील हवाईयोद्ध्यांचीही भेट घेतली. प्रत्येक भूमिका आणि कर्तव्ये कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे निश्चित ध्येय घेऊन प्रयत्न सुरु असल्याबद्दल हवाई दल प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले. आणि भविष्यातही अशाच चिकाटीने कर्तव्य पार पडत राहावे, असे आवाहन केले.
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651080)
Visitor Counter : 220