आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
दैनंदिन चाचणीमधील एका अभूतपूर्व लाटेचा भारत साक्षीदार
गेल्या 24 तासात झाल्या 11.7 लाखांपेक्षा अधिक कोविड चाचण्या
एकूण चाचण्या 4.5 कोटींपेक्षा अधिक
Posted On:
03 SEP 2020 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2020
गेल्या दोन दिवसांपासून दररोज दहा लाखांहून अधिक चाचण्या घेण्याचा सपाटा सुरू ठेवत, भारतामध्ये दैनंदिन चाचण्यांमध्ये आज अभूतपूर्व वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांत 11.7 लाखांहून अधिक (11,72,179) चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या यशामुळे संचयी चाचण्या 4.5 कोटींपेक्षा अधिक (4,55,09,380) झाल्या आहेत.
यातून दररोजच्या कोविड-19 चाचण्यांमधील भारतातील चाचण्यांचे घातांकीय वाढीचे प्रमाण दर्शविते. 30 जानेवारीपासून दररोज 10 चाचण्या घेण्यास प्रारंभ झाल्यापासून, आजमितीला रोजची सरासरी 11 लाखांपुढे गेली आहे.
भारतातील रोजचा चाचणीचा दर हा जगातील उच्च दरांपैकी एक आहे. विस्तीर्ण भागात ठराविक काळासाठी अशा उच्च पातळीवरील चाचण्या लवकर निदान करण्यास सक्षम करतात आणि त्याचे रूपांतर अखंड विलगीकरण आणि प्रभावी रुग्णालयात दाखल करण्याच्या सुविधांमध्ये होत आहे. त्यामुळे अखेरीस मृत्यूदराचे प्रमाण कमी होते. चाचणीची उच्च संख्या देखील परिणामी बाधित रुग्णसंख्येचा दर कमी करते.
देशभरातील चाचणी प्रयोगशाळेच्या जाळ्यांमधील तितक्याच वेगवान विस्तारामुळे चाचणीतील ही वाढ देखील शक्य झाली आहे. भारतात आज 1623 प्रयेगशाळा देशभरात आहेत, 1022 प्रयोगशाळा या सरकारी क्षेत्रात आणि 601 खासगी प्रयोगशाळा आहेत. यातील समाविष्ट होणाऱ्यांमध्ये :
- रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 823 : (शासकीय : 465 + खासगी : 358)
- ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 678 (शासकीय : 523 + खासगी : 155)
- सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 122 : (शासकीय : 34 + खासगी 88)
तसेच, 5 ठिकाणी कोबास 6800/8800 मशीन अत्याधुनिक उच्च दर्जाची यंत्रणा बसविण्यात आली आहे : आयसीएमआर – राजेंद्र मेमोरिअल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, पटना; आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कॉलरा अँड इंटरिक डिसीजेज, कोलकाता; नॅशनल सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल, दिल्ली; आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, मुंबई; आणि आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड रिसर्च, नॉएडा. येथे दररोज कमीत कमी मानवी हस्तक्षेपासह सुमारे 1000 चाचण्या करता येऊ शकतात.
मोठी शहरे / शहरी भाग चाचण्यांनी मोठ्या प्रमाणावर व्याप्त असतानाच पहिल्या टप्प्यात चाचणी क्षमतांमध्ये आरटी – पीसीआर चाचणी वाढविण्यात आली, जी सुवर्ण मानक ठरली, याबरोबरच दुसऱ्या टप्प्यात जिल्हा पातळीवर मॉलीक्युअर अॅसे (assay) तत्वावरील चाचण्या वाढविण्यात आल्या. तिसऱ्या टप्प्यात, प्रतिबंधित क्षेत्रात आणि रुग्णालयांमध्ये ज्या ठिकाणी मॉलीक्युलर चाचण्या उपलब्ध नव्हत्या, तेथे अंटिजेन चाचण्या करण्यास सुचविण्यात आले.
कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in
कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
B.Gokhale/S.Shaikh/P.Malandkar
(Release ID: 1650981)
Visitor Counter : 229
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam