PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 02 SEP 2020 8:22PM by PIB Mumbai

दिल्‍ली-मुंबई, 2 सप्‍टेंबर 2020

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

जनतेला अधिक चांगल्या सेवा पुरवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नवीन व्यापक नागरी सेवा सुधारणा कार्यक्रम जाहीर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज “मिशन कर्मयोगी” या नावाने नागरी सेवा क्षमता निर्मितीच्या नवीन राष्ट्रीय आराखड्याला मंजुरी दिली असून केंद्र सरकारच्या वैयक्तिक, संस्थात्मक आणि प्रक्रिया स्तरावर क्षमता वाढवण्याच्या यंत्रणेत परिवर्तन घडवणे हा याचा उद्देश आहे.

यूएसआयएसपीएफ’च्या तिस-या वार्षिक शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवार, 3 सप्टेंबर 2020 रोजी विशेष बीज भाषण होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होत असलेल्या या शिखर परिषदेमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9.00 वाजता पंतप्रधान मोदी यांचे भाषण होणार आहे.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

  • जागतिक स्तरावर इतर अनेक देशांच्या तुलनेत कोविड मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. जागतिक स्तरावर कोविड मृत्यूदर 3.3 टक्के आहे. तर भारतामध्ये कोविड-19 मुळे होत असलेल्या मृत्यूदराचे प्रमाण 1.76 टक्के आहे. प्रति दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर जागतिक पातळीच्या तुलनेमध्ये भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. जागतिक सरासरी आकडेवारीनुसार प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 110 जणांचा मृत्यू कोविडमुळे होत आहे. तर भारतामध्ये हा आकडा 48 आहे. ब्राझील आणि युकेमध्ये तुलनेने अनुक्रमे 12 आणि 13 पट जास्त मृत्यू कोविडमुळे होत आहेत.
  • भारताने आज रुग्ण बरे होण्याचा 29 लाखाचा (29,01,908) टप्पा पार केला. या आधी 22 दिवसात 10 लाख रुग्ण बरे झाल्याची नोंद होती. त्या तुलनेत गेल्या केवळ 17 दिवसांत 10 लाख रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. मे 2020 पासून, बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत 58 पट वाढ झाली आहे. 12 राज्य/केंद्रशासित प्रदेशांचा रुग्ण बरे होण्याचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. एकूण बरे झालेल्यांपैकी सुमारे 30% हे केवळ महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन राज्यातील आहेत.

 

इतर अपडेट्स

 

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्र सरकारने कोविड-19 रुग्णांसाठी खासगी रूग्णालयातील 80 टक्के खाटा आरक्षित ठेवण्याच्या निर्णय आणखी तीन महिन्यांसाठी वाढवला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, खाटांच्या उपलब्धतेबरोबर उपचाराचा दरही नियंत्रित केला जाईल. दरम्यान, राज्यात मंगळवारी 15,765 नवीन रुग्णांची नोंद झाली, यासह राज्यातील रुग्णांची संख्या 8 लाखांपेक्षा अधिक झाली. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 1.98  लाख एवढी आहे.  

FACT CHECK

***

M.Chopade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650775) Visitor Counter : 176