अर्थ मंत्रालय

मुद्रित क्रियांशी संबंधित आर्थिक सूचना


सर्व दिनदर्शिका, डायरी, वेळापत्रक आणि तत्सम इतर सामग्री, जी पूर्वी भौतिक स्वरुपात छापली जात होती, ती आता मंत्रालय / विभाग / पीएसयू / पीएसबी द्वारे डिजिटल केली जाईल.

मंत्रालय / विभाग / पीएसयू / पीएसबी आणि सरकारचे इतर सर्व विभाग डिजिटल किंवा ऑनलाइन पद्धती वापरण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गांचा अवलंब करणार

Posted On: 02 SEP 2020 5:18PM by PIB Mumbai

 

उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने जगभरात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल होत असताना भारत सरकारनेसुद्धा या सर्वोत्तम पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या वर्षात कोणत्याही मंत्रालये / विभाग / पीएसयू / पीएसबी आणि सरकारच्या इतर सर्व विभागाकडून भिंतीवरील दिनदर्शिका, डेस्कटॉप कॅलेंडर, डायरी आणि इतर अशा प्रकारच्या वस्तू मुद्रित केल्या जाणार नाहीत.

हे सर्व उपक्रम डिजिटल आणि ऑनलाइन पद्धतीने होतील.

अशा विषयांत नाविन्यपूर्ण पद्धतींचा समावेश करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे. नियोजन, वेळापत्रक आणि अंदाज यासाठी तांत्रिक नवकल्पनांचा वापर करणे हे किफायतशीर, कार्यक्षम आणि प्रभावी म्हणून परिचित आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे प्रशासन मॉडेल तंत्रज्ञानाला सक्षम म्हणून नेहमीच पाहत राहिले. आपल्या कामात तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करणे हे त्यांच्या दृष्टिकोनाला अनुसारणारे आहे. म्हणून सर्व दिनदर्शिका, डायरी, वेळापत्रक आणि तत्सम इतर सामग्री, जी पूर्वी भौतिक स्वरुपात छापली जात होती, आता डिजिटल केली जातील. कॉफी टेबल बुकचे प्रकाशन देखील थांबविले जाईल आणि ई-बुक्सच्या योग्य वापरास प्रोत्साहन दिले जाईल. सर्व मंत्रालये / विभाग / पीएसयू / पीएसबी आणि सरकारच्या इतर सर्व विभागांना डिजिटल किंवा ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गांचा अवलंब करावा लागेल. भौतिक स्वरूपातील कॅलेंडर किंवा डायरीसारखेच परिणाम प्राप्त करण्यासाठी नाविन्यपूर्ण डिजिटल आणि ऑनलाईन उपाययोजनांना प्राधान्य दिले जाईल आणि त्या प्रत्यक्षात आणल्या जातील.

सर्व संबंधितांना आवश्यक आदेश जारी केले आहेत. (कृपया पहा)

******

G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1650661) Visitor Counter : 234