अर्थ मंत्रालय

ऑगस्ट 2020 मध्ये झालेले वस्तू आणि सेवा कर संकलन


ऑगस्ट 2020 मध्ये 86,449 कोटी रुपये एकूण वस्तू आणि सेवा कर माध्यमातून महसूल जमा

Posted On: 01 SEP 2020 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर,2020 


ऑगस्ट,2020 मध्ये एकूण 86,449 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर माध्यमातून महसूल जमा झाला. यामध्ये सीजीएसटी 15,906 कोटी रुपये, एसजीएसटी 21,064 कोटी रुपये, आयजीएसटी 42,264 कोटी रुपये (यामध्ये 19,179 कोटी रुपये आयात मालावरच्या शुल्काचाही समावेश आहे) आणि कर 7,215 कोटी रुपये (यामध्ये 673 कोटी आयात मालावरील कराचाही समावेश) आहे. 

सरकारने आयजीएसटीच्या माध्यमातून नियमित तोडगा काढून सीजीएसटीचे 18,216 कोटी रुपये, आणि एसजीएसटीचे 14,650 कोटी रुपयांचा व्यवहार पूर्ण केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने ऑगस्ट 2020 मध्ये मिळवलेला महसूल पुढील प्रमाणे आहे. - यामध्ये सीजीएसटीने 34,122 कोटी रुपये आणि एसजीएसटीने 35,714 कोटी रुपये कमावले आहेत. 

गेल्यावर्षी याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2019 मध्ये जीएसटीचा महसूल 88 टक्के जमा झाला होता.  आयातीमधून  77 टक्के महसूल मिळाला आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवा आयातींसह) महसूल 92 टक्के होता. तसेच पाच कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांना सप्टेंबरपर्यंत करविवरण भरण्यातून सवलत देण्यात आली आहे. 

वस्तू आणि सेवा कर महसुलाविषयी मासिक उत्पन्नाचा तपशील एका तक्त्यामध्ये येथे देण्यात आला आहे. यामध्ये राज्यांची आकडेवारीही देण्यात आली आहे. 

 

तपशीलासाठी येथे क्लिक करावे

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650510) Visitor Counter : 225