माहिती आणि प्रसारण मंत्रालय
देशाने आपला एक महान सुपुत्र गमावला, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माजी राष्ट्रपति प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
31 AUG 2020 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 31 ऑगस्ट 2020
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशाचे माजी राष्ट्रपति प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
शोक संदेशात केंद्रीय मंत्री म्हणाले , “भारताने आपल्या महान सुपुत्रांपैकी एक , भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना गमावले आहे. मुखर्जी हे केवळ विद्वान नव्हते तर एक निर्णयकर्ते , रणनीतिकार आणि अनेक वर्षे संसदेचा कणा होते. त्यांनी शासन आणि प्रशासनावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. भारताचे राष्ट्रपति म्हणून त्यांनी स्पष्ट आकलन आणि प्रतिष्ठेसह आपली जबाबदारी पार पाडली.”
जावडेकर यांनी त्या कालखंडाचे स्मरण केले जेव्हा त्यांनी त्यांची भाषणे प्रकाशित करण्यासाठी मुखर्जी यांच्याकडून परवानगी मागितली होती आणि माजी राष्ट्रपतींनी दयाळूपणे त्यांना परवानगी दिली होती.
M.Chopade /S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1650227)
आगंतुक पटल : 200
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada