राष्ट्रपती कार्यालय

ओणमच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

Posted On: 30 AUG 2020 8:42PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ओणमच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत, आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे :-

ओणमच्या या शुभ प्रसंगी माझ्या सर्व देशबांधवांना विशेषतः केरळमधील माझ्या बंधू आणि भगिनींना मी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे.

ओणमचा सण आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. नव्या पिकांच्या आगमनाबद्दल आपण आपल्या भूमातेविषयी व्यक्त  केलेल्या कृतज्ञतेची देखील ती भावना आहे.

कोविड-19 महामारीच्या काळात उत्सव साजरे करताना, आपण समाजातील दुर्बल घटकांची काळजी घेतली पाहिजे आणि आपले कुटुंब आणि आपला समाज यांचे रक्षण करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे.

या सणाच्या निमित्ताने आपल्या देशात सहकार्याची आणि बंधुभावाची भावना वृद्धिंगत होऊ दे आणि आपल्या भूमातेसोबत एकात्मतेने राहताना समृद्धीचा मार्ग लाभू दे”.

 

M.Chopade/S.Patil/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649879) Visitor Counter : 141