उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी ओणमच्या पूर्वसंध्येला नागरिकांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 30 AUG 2020 6:31PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी ओणमच्या पूर्वसंध्येला नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे:

ओणमच्या शुभ प्रसंगी मी आपल्या देशातील लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो.

 

केरळचा प्रामाणिक, निष्पक्ष, न्यायप्रिय, दयाळू आणि लोकांप्रती सहानुभूती असणारा महान राजा महाबली याच्या स्मृतीनिमित्त ओणमचा सण साजरा केला जातो. पारंपरिक खेळ, संगीत, नृत्य आणि भव्य मेजवानी 'ओनसाद्य' द्वारे ओणमचा सण साजरा केला जातो. केरळमधील लोकांच्या घरात व हृदयात राजा महाबलीचे स्वागत करण्यासाठी सुंदर फुलांचे गालीचे घातले जातात.

या ओणममध्ये आपण भौतिक समृद्धी साजरी करत असतानाच महान राजा महाबलीने मान्यता दिलेल्या प्रामाणिकपणा, सचोटी, दयाळूपणा, करुणा, नि:स्वार्थता आणि त्याग या मूल्यांचे देखील स्वतःला स्मरण करून देऊया.

ओणम म्हणजे कुटुंब आणि मित्रांसाठी एकत्र येण्याची आणि उत्सव साजरा करण्याची एक संधी आहे. पण कोविड -19 च्या प्रसारामुळे यावर्षी उद्भवलेल्या अभूतपूर्व आरोग्य आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर, मी देशवासियांना ओणम घरीच साध्या पद्धतीने साजरा करण्याचे, आणि कोविडशी संबंधित आरोग्य आणि स्वच्छता प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करतो.

हा आनंदोत्सव आपल्या देशात शांती, समृद्धी आणि आनंदाच्या नवीन पर्वाची सुरूवात करेल अशी आशा मी व्यक्त करतो.

********

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1649839) Visitor Counter : 136