आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात रुग्ण बरे होण्याचा उच्च दर कायम, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 27 लाखांपेक्षा अधिक


बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रीय रुग्णांपेक्षा 3.5 पटीने अधिक

Posted On: 30 AUG 2020 6:19PM by PIB Mumbai

 

जास्तीत जास्त रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जात आहे आणि गृह अलगीकरणामुळे (सौम्य आणि अतिसौम्य रुग्णांसाठी), देशातील बरे झालेल्या कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या 27 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. 27,13,933 रुग्ण बरे झाले आहेत कारण, केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे चाचण्यांची व्यापकता, सर्वसमावेशक मागोवा आणि विस्तारीत वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या माध्यमातून उपचार याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

गेल्या 24 तासांत 64,935 रुग्ण बरे झाले आहेत, भारतातील रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा होऊन तो सध्या 76.61% आहे. गेल्या काही महिन्यांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. 

बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रीय रुग्णांपेक्षा 3.55 पटीने अधिक आहे.

भारतात 19.5 लाख (19,48,631) रुग्ण बरे झाले आहेत, जे सक्रीय रुग्णांपेक्षा (765302, जे सध्या सक्रीय वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत) अधिक आहेत. रुग्ण बरे होण्याच्या उच्च दरामुळे देशातील प्रत्यक्ष रुग्णभार म्हणजे सक्रीय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे, सध्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 21.60% सक्रीय रुग्ण आहेत. यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्यातील अंतर वाढत आहे.

वेळेत आणि रुग्णालय व्यवस्थापनामुळे गंभीर रुग्णांची सर्वांगीण देखभाल होत आहे, त्यामुळे मृत्यू दर सातत्याने कमी होत आहे, आज मृत्यूदर कमी होऊन तो 1.79% एवढा आहे.

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/  आणि @MoHFW_INDIA.

तांत्रिक गोष्टींच्या  संपर्क saसाधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in

कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

* * *

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649834) Visitor Counter : 192