अर्थ मंत्रालय

कोविड-19 संबंधित कर्ज प्रकरणांविषयी आराखडा अंमलबजावणीसाठी वित्त मंत्री शेड्यूल कमर्शियल बँका आणि एनबीएफसी यांचा वित्त मंत्री आढावा घेणार

Posted On: 30 AUG 2020 2:37PM by PIB Mumbai

 

कोविड-19 महामारीच्या उद्रेकामुळे बँकांवर कर्ज प्रकरणांचा आलेला मोठा ताण लक्षात घेवून या संदर्भात आराखडा करून त्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण येत्या, गुरूवारी- दि. 3 सप्टेंबर,2020 रोजी देशातल्या शेड्यूल्ड कमर्शियल बँका आणि एनबीएफसीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाबरोबर समीक्षा बैठक घेणार आहेत.

व्यवसायाच्या व्यवहार्यतेचा विचार करून कर्जांच्या ताणांसंबधी विशिष्ट चौकट तयार करण्यात येत आहे. यासाठी  बँकेच्या धोरणांना अंतिम रूप देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत. बँकावर आलेला कर्ज ताण कमी करण्यासाठी सुकरतेने आणि वेगाने धोरणांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, यावर या आढावा बैठकीत भर देण्यात येणार आहे.

****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649739) Visitor Counter : 162