पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेने यशस्वी सहा वर्ष पूर्ण केल्याबद्दल व्यक्त केला आनंद
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                28 AUG 2020 12:10PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020
जनधन योजनेने यशस्वी सहा वर्ष पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री जनधन योजना (PM-JDY)यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अविश्रांत मेहनत घेतली त्या सर्वांबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार  काढले आहेत.
पंतप्रधान म्हणाले “सहा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी प्रधानमंत्री जनधन योजना(PM-JDY) जाहीर झाली होती. बँकिंग क्षेत्रापासून लांब असलेल्यांना बँकिंगमध्ये आणण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट त्यामागे होते.
हा उपक्रम मूलगामी असल्यामुळे दारिद्रय रेषेखालील करोडो लोकांना फायदेशीर ठरला. करोडो कुटुंबांचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या प्रधानमंत्री जनधन योजनेचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. योजनेच्यालाभार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. प्रधानमंत्री जनधन योजना यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम केले, त्यांचे मी कौतुक करतो.”
 
 
 
U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar
 
 
 
 
 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1649148)
                Visitor Counter : 340
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam