Posted On:
27 AUG 2020 5:39PM by PIB Mumbai
कोविड – 19 ला धोरणात्मक दृष्टीने प्रतिसाद देताना आणि त्याचे व्यवस्थापन करताना- ``टेस्ट, ट्रॅक, ट्रीट `` - या निरंतर आधारभूत चाचणीच्या मुख्य तत्त्वावर भर देण्यात आला, ज्यामुळे लवकर निदान होत आहे. वेळेवर निदान केल्यामुळे बाधित (पॉझिटिव्ह) रुग्णांना योग्य उपचारांसाठी स्वतंत्रपणे ठेण्याची किंवा रुग्णालयात दाखल करण्याची संधी मिळते. यामुळे मृत्यूदर कमी होतो आणि रुग्ण वेगाने बरे होतात.
भारतात रुग्णांच्या चाचण्या आज जवळपास 3.9 कोटींवर पोहोचल्या आहेत. देशभरात गेल्या 24 तासात 9,24,998 लाख चाचण्या घेण्यात आल्या. यामुळे एकूण चाचणी संख्या 3,85,76,510 पर्यंत वाढली आहे.
अनेक रुग्ण बरे होत आहेत आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येत आहे आणि घरात विलगीकरण केले जात आहे (सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे रुग्ण असल्यास), भारतातील कोविड – 19 रुग्ण बरे होण्याची रुग्ण संख्या आज 25 लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्राने नेमून दिलेल्या धोरणांची राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे 25,23,771 रुग्ण बरे होणे शक्य झाले आहे, गेल्या 24 तासात 56,013 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील कोविड–19 चे रुग्ण बरे होण्याचा दर आजमितीला 76.24 % इतका आहे.
भारतात सक्रीय रुग्ण संख्येच्या (7,25,991 जे वैद्यकीय उपचार घेत आहेत.) तुलनेत जवळपास 18 लाख (17,97,780) रुग्ण बरे झाले आहेत. सातत्याने मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्यामुळे, हे निश्चित झाले आहे की देशातील वास्तविक रुग्ण संख्या उदा. सक्रिय रुग्णांमध्ये एकूण बाधित रुग्णांपैकी 21.93 % रुग्णांचा समावेश आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या वैद्यकीय व्यवस्थापनाच्या नियमांमध्ये नमूद केल्यानुसार रुग्णाची काळजी घेण्याच्या मानकांवर लक्ष केंद्रित करून, अतिदक्षता विभागात आणि रुग्णालयात उत्तम कौशल्यपूर्ण डॉक्टर, सुधारित रुग्णवाहिका सेवा, ऑक्सिजनचा मर्यादित वापर आणि संशोधनात्मक पद्धतींचा वापर करून राष्ट्रीय मृत्यू दर (सीएफआर) कमी राखला गेला आहे. आज या दऱातील घसरण 1.83 % इतकी आहे. राष्ट्रीय सरासरी पेक्षा 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे.
चाचणी प्रयोगशाळेच्या जाळ्यांच्या क्रमवारील विस्ताराच्या माध्यमातून देशभर व्याप्ती वाढविण्यात यश आले आहे. शासकीय क्षेत्रातील 993 प्रयोगशाळा आणि 557 खासगी प्रयोगशाळांसह आतापर्यंत एकूण प्रयोगशाळांची संख्या 1550 वर पोहोचली आहे. यामध्ये समाविष्ट होणाऱ्यांमध्ये :
रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 795 : (शासकीय : 460 + खासगी : 335)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 637 (शासकीय : 499 + खासगी : 138)
सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 118 : (शासकीय : 34 + खासगी 84)
कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी 2आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी :
https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.
https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
.........
M.Chopade/S.Shaikh/P.Kor