PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
24 AUG 2020 7:31PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 24 ऑगस्ट 2020


(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)


केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रीकरणासंदर्भात कोविड-19 संक्रमणाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने 23 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर केलेली आदर्श नियमावली, सर्व प्रकारच्या माध्यम निर्मात्यांसाठी लागू आहे. यात चित्रपटांचे चित्रीकरण, दूरचित्रवाणी निर्मिती, वेब सिरीज आणि इलेक्ट्रॉनिक आणि चित्रपट माध्यमाशी संबंधित सर्व प्रकारच्या चित्रीकरणाचा समावेश आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
- भारतामध्ये बरे झालेल्या कोविड रूग्णांची संख्या आज 23 लाखांपेक्षा जास्त आहे. अनेक रूग्ण कोरोना आजारातून पूर्णपणे बरे होत आहेत. त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात येत आहे. (तसेच अगदी किरकोळ, सौम्य आणि मध्यम प्रकारची लागण झालेल्या रुग्णांना घरामध्येच विलग ठेवण्यात आले आहे. तेही बरे झाले आहेत.) देशभरामध्ये कोविड-19 चा उद्रेक झाल्यानंतर सरकारने चाचण्या करण्याचे प्रमाण अतिशय आक्रमकपणे वाढविले, त्याचा परिणाम चांगला दिसून येत आहे. चाचणी, पाठपुरावा आणि उपचार या तीन गोष्टींची सर्वंकष दक्षता घेवून अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे देशातला कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचा आकडा 23,38,035 पर्यंत पोहोचला आहे. वैद्यकीय उपचार सेवेचे प्रमाणिकरण करण्यात आले आहे. ऑक्सिजनचा नियमित पुरवठा होत आहे काय , हे कसोशीने पाहणे, अतिदक्षता विभाग आणि रूग्णालयांमधले कुशल वैद्यकीय पथक करीत असलेले कार्य, यामुळे कोरोनाग्रस्त लवकर बरे होत आहेत. तसेच रूग्णवाहिका सेवा सुधारण्यात आली आहे. डॉक्टरांकडून आरोग्य सेवा ‘प्रोटोकॉल’चे पालन केले जात आहे. त्यामुळे गंभीर कोविड रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारले आहे. घरामध्येच विलगीकरणामध्ये असलेले रूग्ण लवकर बरे होत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 57,469 कोरोनाचे रूग्ण बरे झाले आहेत. भारतामध्ये कोविड-19 रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. (75.27 टक्के) गेल्या काही महिन्यांपासून बरे होत असलेल्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
इतर अपटेडस:
महाराष्ट्र अपडेटस:
आवाजावरुन कोरोना विषाणू संक्रमणाची चाचणी करण्याविषयीचा पथदर्शी प्रकल्प मुंबई येथील नेस्को जम्बो कोविड केंद्रावर सुरु करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सहाय्याने कोविड संक्रमित व्यक्तींच्या आवाजाच्या चाचणीचे नमुने गोळा करण्यात येत आहेत. तथापी, सध्या सुरु असलेल्या आरटी-पीसीआर चाचण्या मुंबईत सुरुच राहणार आहेत.
FACT CHECK



***
M.Chopade/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1648281)
आगंतुक पटल : 283
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam