श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईएसआयसीच्या अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत पात्रतेच्या निकषात शिथिलता आणि बेरोजगारी भत्त्यांच्या देयकामध्ये वाढ
24 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020 या आधीच्या 25 % ऐवजी कमाल 90 दिवस बेरोजगार व्यक्तीला देय असलेल्या सरासरी वेतनाच्या 50 % दराने आता पेमेंट होणार
ईएसआयसी रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या 10% आयसीयू / एचडीयू सेवां
कोविड-19 साथीच्या काळात ईएसआयसी ने केलेल्या उपाययोजनांचे ईएसआय महामंडळ सदस्यांनी कौतुक केले
Posted On:
21 AUG 2020 1:38PM by PIB Mumbai
कामगार आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार (स्वतंत्र प्रभार) यांच्या अध्यक्षतेखाली ईएसआय महामंडळाच्या काल संध्याकाळी उशिरा झालेल्या 182 व्या बैठकीत कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विपरीत परिणाम झालेल्या कामगारांना त्यांच्या सेवा वितरण यंत्रणेत सुधारणा आणि कामगारांना दिलासा देण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीत खालील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
ईएसआयसी अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना राबवित आहे ज्या अंतर्गत ईएसआय योजनेंतर्गतयेणाऱ्या कामगारांना बेरोजगारीचा लाभ (बेरोजगार भक्ता) दिला जातो. ईएसआय महामंडळाने ही योजना आणखी एक वर्षासाठी अर्थात 30 जून 2021 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड -19 साथीच्या आजाराच्या कालावधीत रोजगार गमावलेल्या कामगारांना सध्याची परिस्थिती आणि सवलत रक्कमेत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 24 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत वाढीव सवलत देय असेल. त्यानंतर ही योजना 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 या कालावधीत मूळ पात्रतेच्या अटीसह उपलब्ध असेल.अशा प्रकारच्या शिथिलता परिस्थितीची आवश्यकता आणि मागणी पाहून 31 डिसेंबर 2020 नंतर या अटींचा आढावा घेण्यात येईल.
मदत मिळण्यासाठी पात्रतेचे निकषही शिथिल केले आहेत, ते खालीलप्रमाणे:
- कमाल 90 दिवसांच्या बेरोजगारीपर्यंत देय असलेल्या पूर्वीच्या 25% दराऐवजी वेतनाच्या सरासरीच्या 50% सवलतीची भरपाई करण्यात आली आहे
- बेरोजगारीनंतर 90 दिवसांनी देय असलेली सवलत 30 दिवसानंतर देय होईल.
- विमाधारक व्यक्ती शेवटच्या मालकाद्वारे दावा पुढे पाठविण्याऐवजी थेट ईएसआयसी शाखा कार्यालयात दावा सादर करू शकतो आणि पेमेंट थेट बँक खात्यात केले जाईल.
- विमाधारकास नोकरीच्या आधी दोन वर्षे कमीतकमी विमा उतरवण्यायोग्य नोकरी असावी आणि त्वरित बेरोजगारीच्या आधीच्या अंशदान कालावधीत 78 दिवसांपेक्षा कमी काळ आणि बेरोजगारीच्या आधीच्या 02 वर्षात उर्वरित अंशदान कालावधीत किमान 78 दिवस योगदान.
कोविड -19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर ईएसआयसी रुग्णालयांमध्ये आयसीयू/एचडीयू सेवा मजबूत करण्याच्या उद्देशाने, सर्व ईएसआयसी रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या 10% पर्यंत खाटा आयसीयू / एचडीयू सेवेसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ईएसआय महामंडळांच्या सदस्यांनी बैठकीत कोविड -19 चा त्यांच्या भागधारकांवर होणारा विपरीत परिमाण कमी करण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांचे तसेच वैद्यकीय सेवेसाठी सर्वसामान्यांना पुरविलेल्या पायाभूत सुविधांसाठी कौतुक केले.
******
U.Ujgare/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1647542)
Visitor Counter : 349
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam