PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 20 AUG 2020 7:07PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

दिल्ली-मुंबई, 20 ऑगस्ट 2020

 

वाढत्या लोकसंख्येचे आव्हान पेलणे अवघड असल्यामुळे विकासाच्या प्रश्नांचे निराकरण करणे अधिकाधिक कठीण होत आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी आज केले. लोकसंख्याविषयक दोन अहवालांच्या आभासी प्रकाशन कार्यक्रमामध्ये नायडू बोलत होते. ‘आयएपीपीडी’च्यावतीने नवी दिल्लीमध्ये आज ‘भारतातल्या जन्म लिंग गुणोत्तराची स्थिती’ आणि ‘भारतामधल्या वृद्धांची लोकसंख्या: स्थिती आणि मदत प्रणाली’ या दोन विषयांचे निष्कर्ष अहवाल प्रसिद्ध करण्यात आले.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

भारताने 14 लाख (14,10,269) रोगमुक्तांची संख्या नोंदवली आहे, जी अजून बाधित असलेल्यांच्या (6,86,395 जे अजून वैद्यकीय देखरेखीखाली आहेत) संख्येहून कितीतरी जास्त आहे. रोगमुक्तांची ही विक्रमी संख्या देशातील वास्तविक रुग्णांची संख्या कमी झाल्याची खात्री दर्शवते. म्हणजेच आता बाधित असलेल्यांची एकूण संख्या कमी होऊन एकूण बाधित झालेल्यांच्या संख्येच्या 24.19% एवढीच आहे. वैद्यकीय चाचण्यांमधून आजाराची निश्चिती, देखरेख आणि संसर्ग-संपर्काचा माग काढणे याशिवाय कोविड-19च्या रुग्णांवर वेळच्यावेळी योग्य उपचार यामुळे जागतिक सरासरीच्या तुलनेत मृत्यूदर खाली आलाच, एवढेच नव्हे तर तो सातत्याने कमी कमी होत जात आहे, (आताचा आकडा 1.89%). याशिवाय जीवरक्षक प्रणालीवर असणाऱ्या बाधित रुग्णांचे प्रमाणही कमी आहे.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स :

राज्यात 1.60 लाख कोरोना रुग्ण असले तरी, अनलॉक उपाययोजनांतर्गत राज्य रस्ते परिवहन महामंडळाने आज सकाळपासून आपली सेवा सुरु केली, मुंबईहून सकाळी 7 वाजता शिवनेरी बस पुण्यासाठी रवाना झाली. राज्यात सर्वदूर साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या दोन दिवस अगोदरच राज्य सरकारने आंतर-जिल्हा बससेवा सुरु केली. पुण्यात नुकत्याच सेरो-सर्वेक्षणात आढळून आले आहे की, पाच उच्च-बाधित क्षेत्रातील रहिवाशांमध्ये कोरोना संक्रमणाविरोधात प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार झाल्या आहेत. त्यानुसार, भारतीय विज्ञान शिक्षण संस्था आणि संशोधन आधारीत सर्वेक्षणानुसार, विषाणूबद्दल मानवी शरीराची प्रतिक्रिया समजून घेण्याच्या प्रयत्नातून ‘निष्क्रिय करणारी प्रतिपिंडे’ शोधण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. अशा प्रकारचे हे कदाचित देशातील पहिलेच सर्वेक्षण असेल.

 

FACT CHECK

* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1647400) Visitor Counter : 261