आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

रोगमुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्या वाढीबरोबरच, बरे होणाऱ्या रुग्णांची भारतातील एकूण संख्या 21 लाखांवर पोहोचली


रोगमुक्तीचा दर आणखी सुधारत – आज जवळपास 74% पर्यंत

बाधितांच्या संख्येपेक्षा रोगमुक्तांची संख्या तिपटीहून जास्त

Posted On: 20 AUG 2020 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑगस्‍ट 2020


रुग्ण रुग्णालये वा गृह विलगीकरणातून (सौम्य आणि साधारण केसेसमध्ये) मुक्त होण्याबरोबरच भारताचा कोविड-19 रोगमुक्तीची संख्या आज जवळपास 21 लाखांपर्यंत पोहोचली.  वैद्यकीय चाचण्यांना अग्रक्रम, संसर्गाचा माग काढण्यात वेग आणि योग्य औषधोपचार यांची परिणामकारक अंमलबजावणी यामुळे हे शक्य झाले. आरोग्य व्यवस्थेतील उपचार पद्धती यामध्ये सौम्य ऑक्सिजन पुरवठा, रुग्णालये व ICU मधे कुशल वैद्यकिय व्यावसायिक आणि सुधारित रुग्णवाहिका सेवा यामुळे अपेक्षेनुसार सुधारित परिणाम मिळाले.

गेल्या 24 तासात 58,794 जणांच्या रोगमुक्तीसोबतच, भारतातील कोविड-19च्या रुग्णांच्या रोगमुक्तीचा दर 74% (73.91%) पर्यंत पोचला. यावरून गेल्या काही महिन्यात रुग्णांचा बरे होण्याचा दर सतत गतीने  वाढत आहे हे लक्षात येते.

भारताने 14 लाख (14,10,269) रोगमुक्तांची संख्या नोंदवली आहे, जी अजून बाधित असलेल्यांच्या (6,86,395 जे अजून वैद्यकीय देखरेखीखाली आहेत) संख्येहून कितीतरी जास्त आहे. रोगमुक्तांची ही विक्रमी संख्या देशातील वास्तविक रुग्णांची संख्या कमी झाल्याची  खात्री दर्शवते. म्हणजेच आता बाधित असलेल्यांची एकूण संख्या कमी होऊन एकूण बाधित झालेल्यांच्या संख्येच्या 24.19% एवढीच आहे. 

वैद्यकीय चाचण्यांमधून आजाराची निश्चिती, देखरेख आणि संसर्ग-संपर्काचा माग काढणे याशिवाय कोविड-19च्या रुग्णांवर वेळच्यावेळी योग्य उपचार यामुळे जागतीक सरासरीच्या तुलनेत मृत्यूदर खाली आलाच, एवढेच नव्हे तर तो सातत्याने कमी कमी होत जात आहे, (आताचा आकडा 1.89%). याशिवाय जीवरक्षक प्रणालीवर असणाऱ्या बाधित केसेसचे प्रमाणही कमी आहे.

 

तांत्रिक बाबी, सूचना आणि सल्ले या कोविड-19 संबधीत सर्व सत्य आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया नियमितपणे https://www.mohfw.gov.in/ आणि MoHFW_INDIA इथे भेट द्या.

कोविड-19शी संबधीत तंत्रज्ञानविषयक आपल्या शंका आपण technicalquery.covid19[at]gov[dot]in ला पाठवू शकता आणि इतर शंका ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva इथे विचारू शकता .

कोविड-19 बद्दलच्या कोणत्याही शंका आपण आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय हेल्पलाईन क्रमांक +91-11-23978046 किंवा 1075 (टोल-फ्री). राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचे कोविड-19 साठीच्या क्रमांकांची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf  येथे उपलब्ध आहे.


* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647308) Visitor Counter : 200