आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताचे अधिकाधिक चाचण्यांच्या दिशेने मार्गक्रमण सुरू, सलग दुसऱ्या दिवशी आठ लाखाहून जास्त चाचण्या
दर दहा लाख लोकसंख्येमागे(TPM) चाचण्यांची संख्या वाढती, 23,002 चा आकडा पार, परंतु चाचणीअंती बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण आठ टक्क्यांवर स्थिर
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2020 6:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2020
'चाचणी, पाठपुरावा, उपचार' या त्रिसूत्री धोरणावरचा भर कायम ठेवून भारताने सलग दुसऱ्या दिवशी आठ लाखाहून जास्त कोविड नमुन्याच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. चाचण्यांची संख्या सतत वाढवत नेऊन प्रतिदिन दहा लाखापर्यंत नेण्याचा देशाचा निर्धार कायम आहे. गेल्या 24 तासात 8,01,518 नमुन्याच्या चाचण्या करण्यात आल्या.

आतापर्यंतच्या एकूण चाचण्यांची संख्या 3 कोटी 17 लाख 42 हजार 882 झाली. आहे दर दहा लाख लोकसंख्येमागे केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होऊन ती 23,002 पर्यंत पोहोचली आहे.
चाचण्या आक्रमकरित्या केल्या तरच कोविड बाधित रुग्ण प्रभावीपणे शोधून काढता येतील, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा माग काढून त्यांचे विलगीकरण व प्रभावी वैद्यकीय सुविधांद्वारे त्वरित उपचार करता येतील.
बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढण्यासाठी, बरे झालेल्या व सक्रिय रुग्णांच्या संख्येतला फरक वाढण्यासाठी आणि मृत्युदर घटण्यासाठी कोविड चाचण्यांच्या वाढत्या संख्येमुळे मोठी मदत झाली आहे.
भारताने श्रेणीबद्ध व परिस्थितीनुरूप बदलत्या धोरणाचा अवलंब केला आणि देशभरातल्या खाजगी व सरकारी प्रयोगशाळांचे जाळे बळकट केले. जानेवारी 2020 मध्ये देशभरात केवळ एक कोविड चाचणी प्रयोगशाळा होती, आणि आज त्यांची संख्या वाढून 1,486 झाली आहे. त्यात 975 प्रयोगशाळा सरकारी व 511 प्रयोगशाळा खाजगी आहेत.
त्यांची माहिती खालील प्रमाणे:
◆रिअल टाइम RT-PCR प्रयोगशाळा- 762 (सरकारी: 452 + खाजगी : 310)
◆TrueNat प्रयोगशाळा : 607 (सरकारी: 489 + खाजगी: 118)
◆CBNAAT प्रयोगशाळा: 117 (सरकारी: 34 + खाजगी: 83)
माहितीसाठी तसेच तांत्रिक अडचणी, मार्गदर्शन आणि सूचनांसाठी कृपया नियमितपणे खालील संकेतस्थळाला भेट द्या- https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.
कोविड -19 च्या संबंधात तांत्रिक शंकां निरसनासाठी technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर प्रश्नांसाठी ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva. इथे संपर्क करा.
कोविडसंबंधात कुठल्याही प्रश्नासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला खालील हेल्पलाईन नंबर वर फोन करा-+91-11-23978046 or 1075
कोविड संबंधित माहिती साठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे दूरध्वनी क्रमांक या संकेत स्थळावर मिळू शकतील:
https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
M.Chopade/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1647029)
आगंतुक पटल : 272