आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताने आणखी एक शिखर सर केले: बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 20 लाखांच्या पुढे गेली


एका दिवसातील रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक; गेल्या 24 तासांत 60,091 रुग्ण बरे झाले

देशातील रुग्ण बरे होण्याचा दर देखील सर्वोच्च पातळीवर,73% पेक्षा अधिक

Posted On: 19 AUG 2020 1:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2020

जलद गतीने एकूण 3 कोटी चाचण्यांचा टप्पा पार करतानाच भारताने आणखी एक उच्चांक नोंदवला आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आज 20 लाखांच्या पुढे गेली.(20,37,870)

त्याचबरोबर गेल्या 24 तासांत 60,091 इतक्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने  कोविड -19  रूग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे तसेच गृह विलगीकरण (सौम्य आणि मध्यम लक्षणे ) पूर्ण केल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 73% ( 73.44%) या नव्या उच्चांकावर पोहचला असून मृत्युदरातही घट झाली आहे . मृत्युदर आज 1.91% या नीचांकी पातळीवर आहे.

बरे झालेल्या रुग्णांच्या विक्रमी संख्येमुळे देशातील उपचार सुरु असलेले रुग्ण म्हणजेच सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे आणि सध्या हे प्रमाण एकूण सकारात्मक रुग्णांच्या  1/4 पेक्षा कमी (केवळ 24.45%) आहे. बरे झालेल्या रुग्णांची वाढती संख्या आणि घटता  मृत्यूदर हे दर्शवतो  की भारताची श्रेणीबद्ध रणनीती यशस्वी ठरली आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा  (6,76,514).बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13,61,356 ने  अधिक  आहे.

जानेवारी 2020 च्या सुरुवातीपासून, केंद्र सरकारने कोविड -19साठी श्रेणीबद्ध, पूर्व-प्रेरक आणि सक्रिय प्रतिसाद आणि व्यवस्थापन रणनीतीचे काटेकोर पालन केले. केंद्रित, सहकार्यात्मक आणि ‘संपूर्ण सरकारी ’ दृष्टिकोन यशस्वी ठरला आहे.

काळजी घेण्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल करणे, आक्रमकपणे चाचणी करण्याचे धोरण, व्यापक शोध मोहीम आणि प्रभावी उपचार यांची  राज्य /केंद्रशासित प्रदेश सरकारच्या सहकार्याने अंमलबजावणी केली गेली.  प्रभावी देखरेख आणि घरोघरी संपर्क शोधावर  लक्ष केंद्रित केल्यामुळे कोविड रुग्णांची  लवकर ओळख पटवता आली आणि शोध घेता आला. गृह अलगीकरणाद्वारे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉलनुसार, गंभीर आणि अति गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते आणि सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरविली जाते.

राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारच्या प्रयत्नांसह केंद्र सरकारने देशभरातील रुग्णालय सेवा पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे. जेणेकरून बाधित रूग्णांच्या विविध श्रेणीसाठी समर्पित  कोविड सेवा केंद्र  (डीसीसीसी), समर्पित कोविड आरोग्य केंद्र  (डीसीएचसी ) आणि समर्पित कोविड रुग्णालयांच्या (डीसीएच) माध्यमातून  वैद्यकीय सेवा  पुरवली जाईल.  त्यांची संख्याही बरीच वाढली आहे. आज  1667 डीसीएच, 3455 डीसीएचसी आणि 11,597 डीसीसीसी आहेत. एकत्रितपणे त्यांनी  15,45,206 अलगीकरण खाटा 2,03,959 ऑक्सिजन सहाय्य असलेले  बेड्स आणि 53,040 आयसीयू बेड्स प्रदान करतात.

प्रभावी रुग्णवाहिका सेवा आणि काळजी आणि सेवा नाकारण्याबाबत  शून्य सहिष्णुता तसेच तपासणी-उपचारांमुळे कोविड 19 रूग्णांचे  वैद्यकीय व्यवस्थापन  शक्य झाले आहे. . एम्स, नवी दिल्ली यांनी दूरध्वनी-सल्लामसलत सत्रांद्वारे राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील डॉक्टरांची नैदानिक ​​क्षमता वाढवण्यात मदत केली आहे. या अनोख्या उपक्रमाद्वारे, एम्स, नवी दिल्ली येथील तज्ज्ञ डॉक्टर राज्यांमधील रूग्णालयात अतिदक्षता कक्ष सांभाळणाऱ्या डॉक्टरांना मृत्युदर  कमी करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करतात.

राज्य/केंद्रशासित प्रदेशातील 'आशा' चे या प्रयत्नांमध्ये उल्लेखनीय योगदान आहे. सक्रिय रुग्णांचा शोध घेण्याच्या पथकाचा त्या एक भाग असून देखरेख ठेवणे आणि संपर्क शोध मोहिमेला त्यांनी बळ दिले आहे. तसेच घरी अलगीकरणात असलेल्या रुग्णांवर देखरेखीचे  काम केले आहे. वेळेवर उपचारासाठी गंभीररुग्णांना रुग्णालयात पोहचवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी कोविड -19  च्या प्रतिबंध आणि नियंत्रणासंदर्भात उपाययोजनांबाबत केलेल्या जनजागृतीच्या माध्यमातून समाजाला मदत केली आहे. आणि गरजूंना आरोग्य सेवां उपलब्ध करून देण्यातही  मदत केली आहे.

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना पाहायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva .

कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf

 

U.Ujgare/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646901) Visitor Counter : 210