पोलाद मंत्रालय

धर्मेंद्र प्रधान यांनी स्थलांतरीत कामगारांना कमी किंमतीमध्ये घर उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सोबत भागीदारी करण्याचे पोलाद उद्योजकांना केले आवाहन


केंद्र सरकारचे आत्मनिर्भर भारत देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मान आणि स्वाभिमान देण्याचा प्रयत्न करत आहे

Posted On: 18 AUG 2020 5:52PM by PIB Mumbai

 

पोलाद आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्थलांतरीत कामगारांना कमी किंमतीमध्ये घर उपलब्ध करून देण्यासाठी पोलाद उद्योजकांनी सरकार सोबत भागीदारी करावी असे आवाहन केले आहे. आज नवी दिल्ली येथे 'आत्मनिर्भर भारत: गृहनिर्माण व बांधकाम आणि उड्डयन क्षेत्रातील पोलाद वापर' या विषयावर आयोजित वेबिनार मध्ये मुख्य अतिथी म्हणून संबोधित करताना त्यांनी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या योजनेचा उल्लेख करत पीएसयू आणि स्टील उद्योजकांनी या प्रकल्पात सरकार सोबत भागीदारी करण्याचे आवाहन केले. अशी एक लाख घरे उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे परंतु या उद्योगाने पोलादाचा वापर अधिक असणारी, कमी किंमतीची घरे बधली पाहिजेत, जे इतरांसाठी एक मॉडेल असेल असे प्रधान म्हणाले. केंद्र सरकारचे आत्मनिर्भर भारत देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मान आणि स्वाभिमान देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे सरकारच्या अशा कल्याणकारी उपक्रमांमध्ये उद्योग जगताने भागीदारी केली पाहिजे असे मंत्री म्हणाले.

पोलाद  मंत्रालयाने भारतीय उद्योग संघाच्या (सीआयआय) सहकार्याने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. गृहनिर्माण व शहरी कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि नागरी उड्डयन व वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, आणि पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते हे उद्घाटन सत्रासाठी सन्माननीय अतिथी म्हणून हे होते. पोलाद, एचयूए आणि नागरी उड्डयन विभागांचे सचिव, या विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे पीएसयू, उद्योजक आणि सीआयआय चे वरिष्ठ अधिकारी या वेबिनारला उपस्थित होते.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले की गृहनिर्माण व नागरी व्यवहार व नागरी उड्डयन मंत्रालयाचे मोठे-मोठे प्रकल्प आणि त्यांच्या पुढील योजना या पोलाद उद्योगासाठी भविष्यात आनंदवार्ता असतील. देशप्रगतीच्या मार्गावर पुढे जात असल्याने देशात स्टीलचा वापर वाढण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील, सर्वंकष जागतिक-मानक पायाभूत सुविधांच्या स्थापनेचा संदर्भ देत प्रधान यांनी राज्य आणि उद्योग यांना खर्च वाढविण्याचे आवाहन केले. प्रकल्पांना लाल-फितीच्या कारभारातून मुक्त करून ते जलदगतीने कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.

प्रधान म्हणाले की कोविड संकटाच्या काळात भारतीय उद्योगांनी मोठ्या प्रमाणावर पीपीई किट्स, मास्क आणि व्हेंटिलेटर तयार केले आणि भारतीय औषधनिर्मिती उद्योगाने  150 देशांना औषधे पुरविली. याचप्रमाणे, जगातील दुसर्‍या क्रमांकाचा उत्पादक देश असलेल्या भारताने पोलाद आवश्यकतेसाठी प्राधान्य देणारा देश म्हणून उदयाला आले पाहिजे. ते म्हणाले की, देशात चांगल्या प्रतीच्या पोलाद उत्पादनांची कमतरता नाही आणि स्वदेशी उत्पादित पोलादाला प्राधान्य दिल्यास उद्योगाला अधिक पसंती मिळण्यास मदत होईल. कमी किमतीच्या आणि परवडणार्‍या उत्पादनांवर भर देताना मंत्री म्हणाले की उत्पादकता आणि उत्पादन वाढवावे लागेल, मूल्यवर्धित करावे लागेल आणि मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवावे लागतील.

प्रधान यांनी विविध विभागांचे अधिकारी, उद्योग संघटना आणि शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश असलेला एक कार्य गट स्थापन करण्याची मागणी केली, जो स्टीलचा वापर वाढविण्यासाठी धोरणात्मक चौकटीत आणखी सुधारणा करण्यासाठी सूचना देऊ शकेल.

वेबिनारला संबोधित करताना फग्गनसिंग कुलस्ते यांनी देशातील पोलादाचा वापर वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की स्मार्ट सिटीज अभियान , अमृत, प्रादेशिक हवाई मार्ग योजना, उडान यासारख्या सरकारच्या महत्त्वाच्या उपक्रमांमुळे देशातील पोलादाच्या वापराला चालना मिळेल. पोलादाचा वापर हा देशाच्या प्रगतीचा सूचक आहे आणि जगाच्या सरासरीच्या तुलनेत स्टीलच्या दरडोई वापरापैकी एक तृतीयांश वापर भारतात होतो, देशातील हा वापर वाढविण्याला मोठा वाव आहे असे कुलस्ते म्हणाले.

हरदीपसिंग पुरी म्हणाले की आपण आपला मार्ग शोधून कोरोनाशी संबंधित संकटातून बाहेर येऊ होऊ शकतो आणि यासाठी अधिक बांधकाम, अधिक औद्योगिक उपक्रम आवश्यक आहेत. गृहनिर्माण व शहरी व्यवहार व नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अनेक प्रकल्पांची कामे सुरु असून भविष्या या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात पोलादचा वापर होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. पुरी यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, स्वस्त-प्रभावी पद्धती, दर्जेदार चेतना आणि त्याचा वापर सार्वजनिक करण्यासाठी स्पर्धात्मक दराने पोलाद उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. पुरी यांनी असेही सांगितले की नजीकच्या भविष्यकाळात पोलाद मंत्रालयाच्या 300 एमएमटीपीए उत्पादन क्षमतेच्या उद्दिष्टाच्या दृष्टीने शहरी विकास आणि नागरी उड्डयन क्षेत्रातील मागणीकडून जोरदार समर्थन प्राप्त होईल.

गृहनिर्माण आणि इमारत, बांधकाम आणि उड्डयन क्षेत्रांत देशांतर्गत उत्पादित पोलादाचा वापर वाढविण्याच्या संधींवर चर्चा करणे हा वेबिनारचा मुख्य हेतू होता. वेबिनारमध्ये वरील क्षेत्रांमध्ये पोलादाची सद्य व भविष्यातील आवश्यकता ओळखणे; देशांतर्गत उत्पादित पोलाद उत्पादनांचा अवलंब करताना वापरकर्त्यांना भेडसावणारी आव्हाने आणि त्याद्वारे या मागण्या पूर्ण करण्यासाठी देशांतर्गत पोलाद उद्योगाची उत्पादन क्षमता संरेखित करणे या सगळ्या मुद्यांवर विचार विनिमय करण्यात आला. देशातील पोलादाचा जास्तीत जास्त वापर बांधकाम आणि पायाभूत सुविधांमध्ये केला जातो.

****

M.Iyangar/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646726) Visitor Counter : 159