आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
3 कोटी पेक्षा जास्त कोरोना चाचण्या करत भारताने केला नवा टप्पा पार
दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्यांच्या प्रमाणात सातत्याने वाढ, आज हे प्रमाण 21,769
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2020 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2020
लक्ष्यकेन्द्री, सातत्यपूर्ण आणि केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वित प्रयत्नातून भारताने 3 कोटी चाचण्या करत नवा टप्पा पार केला आहे. निदानासाठीच्या प्रयोग शाळांच्या जाळ्याचा विस्तार आणि देशभरात या चाचण्या सहज उपलब्ध होण्याची सुविधा यामुळे चाचण्यांची संख्या वाढण्यासाठी मोठी चालना मिळाली आहे. गेल्या 24 तासात 7,31,697 चाचण्या करत, दररोज दहा लाख चाचण्या करण्याची क्षमता प्राप्त करण्याच्या आपल्या निर्धाराच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे. याच्या बळावर दहा लाख लोकांमध्ये 21,769 चाचण्या करण्यात येत आहेत.
14 जुलैला एकूण चाचण्या 1.2 कोटी होत्या त्यात वाढ होऊन 16 ऑगस्ट 2020 ला ही संख्या 3 कोटी झाली. याच काळात पॉझिटीव्हिटी दर 7.5% वरून 8.81%झाला. चाचण्यांच्या संख्येत वाढ केल्यानंतर सुरवातीला पॉझिटीव्हिटी दरात सुरवातीला वाढ होईल मात्र तत्पर विलगीकरण, शोध आणि वेळेवर वैद्यकीय व्यवस्थापन यासह इतर उपाय योजनांमुळे हळू हळू या पॉझिटीव्हिटी दरात दिल्लीप्रमाणे घट होऊ लागते.

चाचण्या अधिक केल्यामुळे कोविड -19 रुग्ण वेळीच ओळखता येऊन त्याचे सुरवातीलाच विलगीकरण करता येते. याच्या बरोबरीने प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन राबवल्याने मृत्यू दर कमी झाला आहे. म्हणजेच चाचण्यामध्ये वाढ आणि वेळेवर चाचण्या यामुळे पॉझिटीव्हिटी दर कमी होण्याबरोबरच मृत्यू दरही कमी होतो.
चाचण्यांचे धोरण विकसित करण्याच्या निर्धारामुळे देशात निदान चाचण्यांच्या जाळ्याचा विस्तार होत आहे. 2020 मध्ये जानेवारीच्या सुरवातीला पुण्यात केवळ एक प्रयोगशाळा होती आता देशात प्रयोग शाळांची संख्या 1470 झाली आहे. यामध्ये सरकारी क्षेत्रातल्या 969 तर खाजगी 501 प्रयोग शाळांचा समावेश आहे. यामध्ये
- रिअल-टाईम RT PCR प्रयोगशाळा: 754 (शासकीय: 450 + खासगी 304)
- TrueNat आधारीत प्रयोगशाळा: 599 (शासकीय: 485 + खासगी: 114)
- CBNAAT आधारीत प्रयोगशाळा: 117 (शासकीय: 34 + खासगी: 83)
कोविड-19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक तत्वे,आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.
कोविड-19 शी संबंधित तांत्रिक विचारणा technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर मुद्दे ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.
कोविड-19 संदर्भात काही शंका असल्यास कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधा.. कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf वर उपलब्ध आहे.
* * *
M.Iyengar/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1646427)
आगंतुक पटल : 260