आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

स्वातंत्र्य दिनी राष्ट्राला केलेल्या संबोधनात कोविड विरोधातल्या देशाच्या खंबीर लढ्याला पंतप्रधानांचा सलाम

राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची केली घोषणा

Posted On: 15 AUG 2020 6:40PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य क्षेत्रातली केंद्र सरकारची कामगिरी, ठळकपणे मांडत, सध्या सुरु असलेली कोविड- 19 महामारी आणि त्या संदर्भात  भारताच्या श्रेणीबद्ध आणि तत्पर दृष्टीकोनामुळे देश आत्मनिर्भर झाला या बाबींना, 74 व्या स्वातंत्र्य दिनी  राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात स्थान दिले. या आजारात बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुखाःत आपण सहभागी असल्याचे सांगून भारताच्या कोरोना योद्ध्यांनी सेवा परमो धर्मयाचे उदाहरणच दर्शवले आहे असे सांगून या योध्यांची त्यांनी प्रशंसा केली.  कोरोना विरोधातला लढा आपण नक्कीच जिंकू याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रबळ इच्छा आणि संकल्प आपल्याला विजयाकडे नेतो असे त्यांनी सांगितले.

देशाच्या आत्म निर्भरभारत या भावनेमुळे  कोविड-19 च्या काळात स्वयंपूर्णता साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. देशात पूर्वी पीपीई किट, एन 95 मास्क, व्हेंटीलेटर यांची निर्मिती होत नव्हती मात्र आता देश यांची निर्मिती करत असल्याचे ते म्हणाले.जागतिक तोडीच्या अशा  वस्तूंच्या उत्पादन क्षमतेत झालेल्या वाढीमुळे व्होकल फॉर लोकललाही पुष्टी मिळत आहे. 

लाल किल्यावरुन बोलताना पंतप्रधानांनी कोविड चाचण्या करण्याच्या क्षमतेत आपण केलेली  प्रगती सांगितली. केवळ एका प्रयोगशाळेपासून देशात आता 1400 प्रयोगशाळा आहेत. सुरवातीला आपण दिवसाला  300 चाचण्या करत होतो आता आपण दिवसाला 7 लाखाहून अधिक चाचण्या करत आहोत. अतिशय कमी कालावधीत आपण हे साध्य केल्याचे ते म्हणाले.

कोरोना लस विकसित करण्याबाबत भारताच्या धोरणाचाही त्यांनी उल्लेख केला.या वर वैज्ञानिक अतिशय ठाम निर्धाराने काम करत आहेत.सध्या तीन लसी चाचण्याच्या विविध टप्य्यात आहेत.वैज्ञानिकांची मान्यता मिळाल्या नंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु करण्यात येईल.उत्पादन आणि वितरण याबाबत पथदर्शी आराखडा आधीच तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य पायाभूत सुविधा यात देशाची क्षमता व्यापक झाली आहे याबाबत सांगतानाच, नव्या एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांमुळे देशाच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा बळकट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.एमबीबीएसआणि एमडी अभ्यासक्रमात 45,000 पेक्षा जास्त जागा वाढवण्यात आल्या आहेत. सध्याच्या महामारीच्या काळात कोविड व्यतिरिक्त आरोग्य सेवाची तरतूद करण्यात  आयुष्मान भारत आरोग्य आणि वेलनेस सेंटर यांनी बजावलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. 1.5 लाख आरोग्य आणि वेलनेस सेंटरपैकी एक तृतीयांश कार्यरत झाल्याचे ते म्हणाले. प्रधान मंत्री जन आरोग्य योजने मुळे आरोग्य क्षेत्रातल्या सेवा अधिक प्रभावी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय डिजिटल  आरोग्य अभियानाची घोषणा करतानाच प्रत्येक नागरिकाला  विशिष्ट  आरोग्य ओळख क्रमांक देण्यात येईल. यामध्ये एकल आयडी च्या माध्यमातून डाटाबेस मध्ये आजार, निदान, तपसणी अहवाल,औषधोपचार याबाबत तपशीलवार माहिती उपलब्ध होईल असेही त्यांनी स्पष्ट केले

****

B.Gokhale/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1646146) Visitor Counter : 131