पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळच्या पंतप्रधानांदरम्यान दूरध्वनी संवाद
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2020 6:16PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी दूरध्वनी केला.
नेपाळच्या पंतप्रधानांनी सरकार आणि भारतीय नागरिकांना 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या, आणि भारताची नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सभासद म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
दोन्ही नेत्यांनी कोविड-19 संक्रमणाचा परिणाम कमी करण्यासंदर्भात परस्पर एकवाक्यता व्यक्त केली. याबाबतीत पंतप्रधानांनी नेपाळला भारताचे निरंतर सहकार्य जाहीर केले.
पंतप्रधानांनी नेपाळच्या पंतप्रधानांचे दूरध्वनीबद्दल आभार व्यक्त केले आणि भारत आणि नेपाळमधील नागरी आणि सांस्कृतिक बंधाचे स्मरण केले.
******
B.Gokhale/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1646137)
आगंतुक पटल : 272
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam