आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा आणखी एक विक्रम


गेल्या 24 तासांत 57,381 रुग्ण बरे

32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 50% पेक्षा अधिक

भारतात एका दिवसात सर्वाधिक 8.6  लाख कोविड चाचण्या

Posted On: 15 AUG 2020 5:46PM by PIB Mumbai

 

एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे, भारतात एका दिवसात बरे होणाऱ्या कोविड-19 रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत 57,381 रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होत असल्यामुळे, रुग्ण बरे होण्याचा दर 70% च्या वर गेला आहे. तसेच 32 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 50% पेक्षा अधिक आहे. 12 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याच्या दराचे प्रमाण राष्ट्रीय प्रमाणापेक्षा अधिक आहे.  

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येत आहे आणि गृह अलगीकरण (सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे रुग्ण), त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 18 लाखांपेक्षा (18,08,936). अधिक झाली. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय कोविड-19 रुग्ण यांच्यातील अंतर वाढले आहे, सध्या ते 11 लाखांहून अधिक आहे (आजची संख्या 11,40,716 एवढी आहे).

Image

केंद्र सरकार आणि राज्य सरकारे/ केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयाचा हा परिणाम आहे, की दररोज बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

सध्या सक्रीय रुग्णांची संख्या (6,68,220) एवढी आहे. ती आजच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 26.45% आहे, आणखी 24 तासांत यात घट होईल. हे सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

रुग्णालयातील सुधारित आणि परिणामकारक वैद्यकीय उपचारपद्धती, रुग्णालयात रूग्णांना आणण्यासाठीची रुग्णवाहिका सेवा सुधारुन अधिक समन्वय आणणे आणि कोविडच्या रुग्णांना तात्काळ उपचार आणि एम्स, नवी दिल्ली यांच्याकडून टेलि-कन्सलटेशन अशा उपाययोजना सातत्याने केल्या गेल्या. परिणामी, कोविडचा मृत्यूदर, जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत सातत्याने कमी राहिला आहे. आज हा दर 1.98% एवढा आहे.

भारताच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रीटपद्धतीमुळे चाचण्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे, गेल्या 24 तासांत 8,68,679 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामुळे आतापर्यंतच्या एकत्रित चाचण्यांची संख्या 2.85 कोटींपेक्षा अधिक झाली आहे.

श्रेणीबद्ध विस्तार आणि वाढत्या प्रतिसादामुळे चाचणी प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्या देशात 1465 प्रयोगशाळा आहे; 968 प्रयोगशाळा शासकीय आणि 497 खासगी प्रयोगशाळा आहेत. यामध्ये:

रिअल-टाईम RT PCR प्रयोगशाळा: 751 (शासकीय: 448 + खासगी 303)

• TrueNat आधारीत प्रयोगशाळा: 597 (शासकीय: 486 + खासगी: 111)

• CBNAAT आधारीत प्रयोगशाळा: 117 (शासकीय: 34 + खासगी: 83)

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/ आणि  @MoHFW_INDIA.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

****

M.Jaitly/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646128) Visitor Counter : 237